महादेव कोगनुरे यांच्या व्यवसायिकांशी भेटीगाठी…
डॉक्टर इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेकांचा मनसेला पाठिंबा
सोलापूर :
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी शनिवारी शहरातील विविध व्यवसायिकांच्या भेटीगाठी घेतल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या जाणून घेत विकासावर चर्चा केली. डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेक जणांनी महादेव कोगनूरे यांना पाठिंबा दर्शविला.
दक्षिण सोलापूर मतदार संघात प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर असल्याचे दिसत आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचाराला जोरदार सुरुवात केली. दक्षिण सोलापूर मतदार संघाच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पदयात्रा कॉर्नर बैठका सभा झाल्यानंतर आता त्यांनी विविध क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक यांच्या भेटी गाठीवर भर दिला आहे. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांनी शहरातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट, बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, छोटे मोठे दुकानदार अशा अनेकांची भेट घेऊन संवाद साधला. या सर्वांनी यंदा प्रस्थापितांना बाजूला ठेवून आमचे मत तुम्हालाच असेल असा शब्द कोगनुरे यांना दिला.
सोसायट्यामध्ये मनसेची हवा
शहरातील विविध हाऊसिंग सोसायटीमध्ये महादेव कोगनुरे यांनी शनिवारी भेटी देऊन संवाद साधला. अनेक नागरिकांनी सोसायट्यांमध्ये भेडसावणाऱ्या समस्या कोगनुरे यांच्यासमोर मांडल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले अनेकदा सांगूनही समस्या सुटत नसल्याने आणि तुमच्यावर आमचा विश्वास असल्याने यंदा आमचे मत तुम्हालाच असा शब्द नागरिकांनी दिला.