शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील प्रलंबित विकास कामे तत्काळ वेळेवर मार्गी लावा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पालिका आयुक्तांना निवेदन….
वृत्त सविस्तर

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे मजबुतीकरणाचे काम चालू आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये हे काम १९ फेब्रुवारी २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. परंतु तसे झाले नाही आणि काम पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी होती. तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवभक्तांनी मोठ्या सामंजस्याने साजरी केली.
येत्या ०६ जून २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असून हे काम येळेत पूर्ण करण्यात यावे .यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात व काम वेळेवर पूर्ण करावे अशी मागणी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
हे निवेदन देतेवेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नानासाहेब काळे उत्सव अध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे,श्रीकांत बाप्पू डांगे ,श्रीकांत घाडगे, आप्पा सपाटे, शिवाजी वाघमोडे ,विजय भोईटे ,अंबादास शेळके, दिनकर जगदाळे, विश्वनाथ गायकवाड, सचिन स्वामी, प्रकाश ननवरे, गणेश डोंगरे ,नागेश वडणे,यांची उपस्थिती होती…