विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये अवैध ढाब्यांवर केलेल्या कारवाईत ढाबा चालक व मद्यपी यांना रुपये २,९२,५००/- दंड…
विधानसभा निवडणूक २०२४ पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मा. श्री एस आर पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्हयामध्ये दि.१३/११/२०२४ रोजी मौजे मुळेगाव तांडा बक्षी हिप्परगा वरळेगाव तांडा शिवाजीनगर तांडा परिसरात कारवाई करुन अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर कारवाई करुन सदर कारवाईत एकुण ११,४५० ली. रसायन ५७५ ली. हातभट्टी दारु असा एकुण रुपये ७,१४,९९५/- चा प्रोव्हीबिशन गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच या विभागाकडुन अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणा-या आठ ढाब्यांवरती कारवाई करुन ब्रीथ् अॅनलायझर चा वापर करुन वैदयकीय चाचणी नंतर सदर आठ मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा होटगी रोड, जयभवानी ढाबा मंगळवेढा रोड, सावजी कोड्रिंक्स, कन्ना चौक, तसेच पंढरपुर कासेगाव येथील साईराजे, महाराजा ढाबा, तारापूर, माढा येथील राणा ढाबा, माळशिरस येथील सावनी ढाबा, यावर कारवाई करून ढाबा मालक व मद्यपी ग्राहकांना मा. न्यायालायासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी रुपये २५०००/- व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रुपये ३०००/- ईतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून एकुण रु.२,९२,५००/- इतका दंड जमा करुन घेण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढे अशीच चालू राहणार आहे. परवाना नसणा-या ठिकाणी मदय प्राशन केल्याने संबंधित जागा मालक व मदयपी या दोघांवर कारवाई होऊ शकते याची नोंद संबंधितानी घ्यावी.
आचारसंहिता कालावधीमध्ये दि. १५/१०/२०२४ ते दि.१३/११/२०२४ या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकुण २५९ गुन्हे नोद करण्यात आले असुन २५७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कालावधीत केलेल्या कारवाईत ९१,२३० ली. गुळमिश्रित रसायन, ७७८८ ली. हातभट्टी दारु, १६७१ ली. ताडी, ९४३ ब.ली. देशी दारू, ६१८ ब.ली. विदेशी दारु, ७७.९७ ब.ली. बिअर ८३.८८ ब.ली. बनावट विदेशी मद्य व ५९ वाहनासह एकुण १,४२,२१,३४४/- इतका मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक श्री. आर. एम. चवरे, श्री जे. एन पाटील, श्री ओ व्ही घाटगे, श्री डी. एम बामणे श्री पंकज कुंभार, श्री भवड, तसेच दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे, श्री आर एम कोलते, श्री धनाजी पोवार, श्री समाधान शेळके, श्री सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे, सचिन गुठे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, इसमाईल गोडीकट, कपील स्वामी, प्रशांत इगोले अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीरज तोग्गी, तानाजी जाधव, रेवणसिध्द कांबळे वाहनचालक रशीद शेख, दिपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली
अवैध मद्यविक्री. अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.