Super speed news:- राज्य उत्पादन शुल्क विभागाचीअवैध हातभट्टी निर्मिती केद्रावर व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाई रूपये ५,२८,२५०/- चा मुद्देमाल जप्त…

विधानसभा निवडणूक २०२४ पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध हातभट्टी निमिती केद्रावर दिनांक १९/१०/२०२४ रोजीच्या मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निदेशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मा. श्री एस आर पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली मौजे मुळेगाव तांडा बक्षी हिप्परगा वरळेगाव तांडा परिसरात अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर कारवाई करुन सहा गुन्हे नोंद करण्यात आले असुन एक आरोपीवर कारवाई कर्ष्यात आली असुन पाच आरोपी फरार आहेत तसेच निरीक्षक पंढरपुर विभाग यांनी अवैध हातभट्टी दारू वाहतुक करणारी एक मो. सायकल जप्त करुन एक आरोपीवर कारवाई करुन ५० ली. हातभट्टी दारुसह रुपये ६५,५००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर दोन्ही कारवाईत एकुण ११,४५० ली. रसायन १९० ली. हातभट्टी दारु असा एकुण रुपये ५,२८,२५०/- प्रोव्हीबिशन गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई निरीक्षक श्री. आर. एम. चवरे, श्री जे. एन पाटील, श्री ओ व्ही घाटगे श्री पंकज कुंभार, तसेच दुय्यम निरीक्षक श्री समाधान शेळके, श्रीमती गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री मोहन जाधव, संजय चव्हाण, जवान सर्वश्री, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड,
चेतन व्हनंगुटी, इसमाईल गोडीकट, कपील स्वामी, प्रशांत इगोले वाहनचालक रशीद शेख व दिपक वाघमारे संजय नवले यांनी पार पाडली…
अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे….