महादेव कोगनुरे ः मनसेच्या पदयात्रेत पथनाट्यातून जनजागृती…
हद्दवाढ भागातील नागरिकांना हवे नवनिर्माण...
सोलापूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचारार्थ हद्दवाढ भागात बुधवारी सायंकाळी निघालेल्या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून विद्यमान सरकारच्या कारभारावर टीका करून महादेव कोगनुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असा संदेश देण्यात आला…
हद्दवाढ भागातील पदयात्रेदरम्यान बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की हद्दवाढ भागाच्या समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे. हा भाग महापालिके जाऊन काय उपयोग झाला असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत. कोणत्याही सुविधा नसताना कर मात्र भरावा लागत आहे. या भागाचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर नवनिर्माणाची गरज असून त्यासाठी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे जनताच सांगत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे याची खात्री आहे.
दुपारी चार ते रात्री दहापर्यंत ताई चौक, दीक्षित नगर, मल्लिकार्जुन नगर, स्वागत नगर, केंगनाळकर शाळा, हुच्चेश्वर मठ, पारसी मैदान, म्हेत्रे वस्ती, शिवगंगा चौक, विष्णूनगर, शोभादेवी नगर, भीमाशंकर नगर, चंद्रकला नगर,शशीकला नगर, ललिता गट, शांतिनगर झोपडपट्टी १ व २, देसाईनगर, राजीव नगर, बसवेश्वर चौक, शांतीनगर चौक, अरुणोदय नगर, बसवरोड मठ या भागात पदयात्रा उत्साहात झाली.
महिलांचा लक्षणीय प्रतिसाद
हद्दवाढ भागात पाण्याची समस्या मोठी आहे. पाच ते सहा दिवसाआंड येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता महादेव कोगनुरे हा प्रश्न तातडीने सोडवतील असा विश्वास असल्याने त्यांच्या पदयात्रांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.