maharashtrapoliticalsocialsolapur

लोधी आणि मोची समाजातील नागरिकांनी केले देवेंद्र कोठे यांचे जोरदार स्वागत…

प्रभाग क्रमांक १७, १३ आणि १४ च्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद...

 

सोलापूर : प्रतिनिधी

चौका – चौकात रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत लोधी आणि मोची समाजाच्या नागरिकांनी शहर मध्य विधानसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे जोरदार स्वागत केले. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणेराहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला.

प्रभाग क्रमांक १७, १३ आणि १४ या प्रभागांची मिळून ही पदयात्रा काढण्यात आली. बेडर पुलावरून सुरू झालेली ही पदयात्रा नवी तालीम, लोधी गल्ली परिसर, तुळशीदास तालीम, बिरोबा देव मंदिर, कामाठीपुरा परिसर, दाळ गल्ली, जगदंबा चौक, नळ बझार चौक, मुर्गी नाला भाजी मंडई, महावीर चौक, सत्यनाम चौक, कुंभार गल्ली, श्रीराम बेकरी, मौलाली चौक, दत्त मंदिर, सरस्वती चौक, गुलजार तालीम, हेजनपूर परिसर, प्रकाश बापूजी सोसायटी, अलकुंटे चौक, वीर जवान मंडळ, अभयस्तंभ चौक, भगतसिंग चौक, श्रीराम मंदिर परिसर, सत्तर फूट रस्ता, अभयस्त चौक, बापूजी नगर स्लॉटर हाऊस, लोधी गल्ली परिसरमार्गे बापूजी नगर येथील मारुती मंदिरासमोर विसर्जित झाली.

या पदयात्रेत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, जेम्स जंगम, माजी नगरसेवक रवी कैय्यावाले, माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल, सुनिता कामाठी, जुगनबाई आंबेवाले, लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, सुमित पाटील, महेश अलकुंटे, बाबुराव संगेपाग, रवी बुऱ्हाणपुरे, शीतल हजारीवाले, रणजित हजारीवाले, सुरज चव्हाण, दत्तू म्हेत्रे, राजू जमादार, गुलजार शिवसिंगवाले, समशेर आंबेवाले, सज्जन बुऱ्हाणपुरे, रमेश बंबेवाले आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button