राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी आनंददादा चंदनशिवे यांच्या नियुक्तीने पक्ष विस्तारास अधिकची गती मिळेल- जिल्हाध्यक्ष संतोष पवार…
कार्यसम्राट आनंददादांचा जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी भवन कार्यालयात केला विशेष सत्कार...

सोलापूर
माजी गटनेते ,माजी नगरसेवक , कार्यसम्राट विकासाभिमुख नेतृत्व आनंद चंदनशिवे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांनी आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.या निवडीबद्दल शनिवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पक्षाच्या वतीने नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,जेष्ठ नेते हेमंत चौधरी,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ,अनिल उकरंडे,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर , युवक अध्यक्ष सुहास कदम ,माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख,शहर सचिव चंद्रकांत सोनवणे, प्रज्ञासागर गायकवाड ,
महिला आघाडी समन्वयक शशिकला कस्पटे,दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार, शोभा गायकवाड , सुनिता घाडगे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोठीवाले शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके,OBC सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद,VJNT अध्यक्ष रुपेश भोसले ,वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ.संदीप माने सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे,.कामगार विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे,कार्याध्यक्ष संजय सांगळे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे ,
कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, महिपती पवार समदाणी मत्ते खाणे संदेश इंगळे, राजुसिंग फटफटवाले, सरोजनी जाधव ,श्रीनिवास पोतराज यांची उपस्थिती होती .
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्यासह सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष जेष्ठ नेते , प्रांतिक सदस्य महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील जी तटकरे साहेब यांनी आनंद दादांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व पक्षातील सहकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची ताकद आणखी वाढण्यासाठी ही निवड महत्वाची ठरेल आनंददादाच्या निवडीने राष्ट्रवादीचा प्रचार आणि विस्तार करण्यासाठी अधिकची गती मिळेल अशी आशा व्यक्त केली …
तर सत्कार मूर्ती नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी त्यांच्या मनोगतात अजित दादा यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवून प्रदेश वर काम करण्याची संधी दिली त्या संधीचे नक्कीच राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करू राज्यात पक्षाची ताकद आणखीन मजबूत कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहू अशी मत व्यक्त केले….
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर आभार वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख यांनी केले …