डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या कैकाडी समाजातील देशातील पहिल्याच महिला अनुराधा जाधव यांना पीएचडी पदवी प्राप्त…
सोलापूर :=
डॉ.अनुराधा विजय जाधव यांनी मराठी विषयात पी.एचडी.(विद्यावाचस्पती) ही पदवी प्राप्त केली आहे. *कैकाडी समाजातील देशातील पी. एचडी.(विद्यावाचस्पती)पदवी प्राप्त करणार्या पहिल्याच महिला म्हणून त्यांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र राज्य वाड्.मय पुरस्कार प्राप्त कादंबरीतील स्त्री जीवन या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. यासाठी त्यांना प्रा. डॉ. भारती रेवडकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले. ही पदवी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथून प्राप्त केली आहे.
पीएच.डी.साठी महाराष्ट्र राज्यातील प्रज्ञावंत, सुप्रसिद्ध, सिद्ध हस्तलेखक (चारापाणी) रा. र .बोराडे , ( भंडार भोग )राजन गवस, (दशक्रिया) बाबा भांड, (कागुद आणि सावली )आनंद पाटील, (चोंडक) राजन गवस,यांच्या कादंबरीतील स्त्री जीवनाचा अभ्यास त्यांनी केला आहे. अशा थोर साहित्यिकांचा व साहित्याचा अभ्यास वाचकांसमोर व भावी पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या संशोधनातून केलेला आहे.
पीएच.डी. च्या अंतिम मौखिक परीक्षा करिता उपस्थित असलेले बहिस्थ परीक्षक प्रा. डॉ. काळुंखे आर्.व्ही.
यांनी जाधव यांच्या संशोधनाचा सखोल आढावा घेतला. *ज्या वंचित समाजात जाधव यांचा जन्म झाला, त्या समाजात शिक्षण अजूनही पोहोचले नाही. अशा परिस्थितीत एक स्त्री पी.एचडी. पर्यंतचा प्रवास पूर्ण करते, हे समस्त समाजासाठी व शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाची बाब आहे असे गौरवास्पद उल्लेख त्यांनी केला.
सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. तांबोळी आय .जी चंदेले शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री हेमूजी चंदले राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री तोळणूरे एम के व शिक्षक वृद्ध व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
जाधव हे शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून मागील 13 वर्षापासून कार्यरत आहेत. *प्राथमिक शिक्षक असूनही उच्च शिक्षणाची जिद्द बाळगणाऱ्या अत्यंत मोजक्या शिक्षकांपैकी एक असे हे व्यक्तिमत्त्व आहे.
अखिल भारतीय कुळव कैकाडी समाजाचे विश्वस्त श्री नंदुरकर जी. ए व समाजातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.