maharashtrasocialsolapur

जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉ. भास्कर पाटील हॉस्पिटलमध्ये रविवारी मधुमेह तपासणी शिबीर…

सोलापूर, (प्रतिनिधी)ः- जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने डॉ. भास्कर पाटील यांच्या सोलापूर डायबेटीस केअर सेंटरच्या माध्यमातून मोदी सातरस्ता येथील हॉस्पिटल मध्ये रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी मधुमेह रूग्णांची तपासणी आणि त्यांना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. भास्कर पाटील आणि डॉ. ज्योती भास्कर पाटील यांनी दिली.
जगभरात 10 पैकी 1 व्यक्ती मधुमेहासह जगत आहे. आणि जवळपास साडेसात कोटी लोकांना मधुमेह रोगाची लागण झालेली आहे. ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या मधुमेह रुग्णांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो आणि यंदाच्या वर्षी अडथळे तोडणे आणि अंतर भरणे या थीमवर जनजागृती करण्यात येणार आहे. या थीमच्या माध्यमातून मधुमेहाचा धोका कमी करणे आणि मधुमेह झालेल्यांना योग्य आणि कमी खर्चात उचार उपलब्ध करून देणे तसेच रूग्णांना शारीरीक, मानसिक आणि सामाजिक सक्षम करणे यावर भर देण्यात येणार आहे. त्याचनुसार रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी डॉ. भास्कर पाटील यांच्या मोदी येथील हॉस्पिटल मध्ये मधुमेह तपासणी आणि मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये तज्ञांकडून मधुमेहासंबधी मार्गदर्शन, मधुमेहींची शुगर, डोळे तपासणी. विशिष्ट प्रकारचे योगासने शिकवण्यात येणार आहेत. मधुमेहीसाठी गरजेची असलेली पाक कला शिकवली जाणार आहे. करमणुक आणि खेळ यातून बक्षिस देण्यात येणार आहेत. शिबीरात सहभागी झालेल्यांना पाणी, अल्पोपहार, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मधुमेहींनी आपली नोंदणी करून याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
…………………………………………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button