विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा असेल – भाजप प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे…
आयटी पार्कच्या नावाने डोळ्यात धुळ फेकण्यात चे काम सुरू...

विजयकुमार देशमुख हे अत्यंत भावुक स्वभावाचे
सोलापूर : विजयकुमार देशमुख हे अत्यंत भावुक स्वभावाचे आहेत. आपल्याकडे असा देव माणूस आहे. तो सगळ्यांची काळजी घेतो. ते म्हणजे विजयकुमार देशमुख आहेत. समोरच्या व्यक्तीच डिपॉसिट जप्त करू. आणि यामध्ये सिंहाचा वाटा हा युवा मोर्चा चा असेल असा विश्वास युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे यांनी व्यक्त केला.
२४८ विधानसभा सोलापूर शहर उत्तर मतदार संघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ कन्ना चौक तोगटवीर मंगल कार्यालय येथे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अनुप मोरे बोलत होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवा आघाडी, बी आर एस युवा सेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेली सर्व कार्यक्रम आम्ही वेळोवेळी पार पाडत आहोत. नमो चषकाचे शहर उत्तर मतदार संघात मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते. विजयकुमार देशमुख यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की, दरवर्षी दर पाच वर्षांनी त्यांचाकडे मतदारांचा ओघ वाढत जातो. समोरचा उमेदवार कोण आहे ते लोकांना अद्याप माहीतही नाही, तो कोणत्या पक्षात आहे तेही माहित नाही त्यामुळे त्याचे डिपॉझिट जप्त होईल हे निश्चित आहे.विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर व उत्तर मतदार संघात विविध योजना आणलेल्या आहेत. समोरच्या उमेदवाराकडून आयटी पार्क च्या नावाने लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम सुरू आहे असा आरोप माजी नगरसेवक सोलापूर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख यांनी केला.
युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अनुप मोरे हे गेले दोन महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. युवा मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त सभासद एक फॉर्म च्या माध्यमातून जोडण्यात येत आहेत. युवा मोर्चाच्या वतीने आपल्या सोलापूर शहर जिल्हा महाराष्ट्र देश कसा असावा याचे माहिती सभासदांकडून लिहून एका बॉक्सच्या माध्यमातून गोळा करण्यात येत आहे. अशी माहिती वृषाली चालूक्य यांनी दिली….
यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर,प्रदेश सचिव गणेश साखरे,अनिकेत हरपुडे,सागर कोतला,पंकज काटकर, सिद्धार्थ मंजेली,रवी कोटमुळे,आनंद कोलारकर,रोहन सोमा,अजित गादेकर,राजू अचुगतला, राहुल घोडके, पवन आलुरे,दीपक जाधव,नवनाथ सुरवसे,विशाल शिंदे, भार्गव बच्चू,शशी अन्नलदास, दर्शन दरक,योगेश जम्मा,राज पवार, शांतेश स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज झुंजे यांनी प्रास्ताविक डॉक्टर किरण देशमुख तर आभार पंकज काटकर यांनी मानले. या कार्यक्रमास हजारो युवकांची उपस्थिती होती….