सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 184 उमेदवार निवडणूक लढविणार -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद…
एकूण 334 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले होते, तर 150 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली...
विधानसभा मतदारसंघ निहाय स्त्री पुरुष मतदार संख्या
जिल्ह्यातील सर्व मतदारांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करण्याचे आवाहन
सोलापूर, दिनांक 4 जिमाका:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 334 उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरलेले होते दिनांक 4 नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 150 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले असून 184 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील एकुण 11 विधानसभा मतदार संघामध्ये खालीलप्रमाणे निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची विधानसभा मतदार संघनिहाय संख्या……
244- करमाळा, एकुण उमेदवार 31, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 16, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 15,
245- माढा, एकुण उमेदवार 30, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 17, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13,
246- बार्शी, एकुण उमेदवार 31, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 11, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 20,
247- मोहोळ (अ.जा), एकुण उमेदवार 27, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 17, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 10,
248- सोलापूर शहर उत्तर, एकुण उमेदवार 26, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 06, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 20,
249- सोलापूर शहर मध्य, एकुण उमेदवार 39, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 19, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 20,
250- अक्कलकोट, एकुण उमेदवार 15, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 03, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 12,
251- सोलापूर दक्षिण, एकुण उमेदवार 40, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 15, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 25,
252- पंढरपूर, एकुण उमेदवार 38, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 14, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 24,
253- सांगोला एकुण उमेदवार 32, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 19, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13,
254- माळशिरस (अ.जा), एकुण उमेदवार 25, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 13, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 12, एकुण उमेदवार 334, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार 150, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 184.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार संघ निहाय मतदान केंद्र व मतदार संख्या-
मतदार संघ 244-करमाळा, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 347, मतदार -पुरूष 1 लाख 71 हजार 515, महिला- 1 लाख 57 हजार 468, तृतीयपंथीय -11, एकुण 3 लाख 28 हजार 994, सैनिक मतदार-467, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 705.
मतदार संघ 245-माढा, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 355, पुरूष 1 लाख 83 हजार 948, महिला- 1 लाख 68 हजार 740, तृतीयपंथीय -03, एकुण 3 लाख 52 हजार 691, सैनिक मतदार-355, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 186.
मतदार संघ 246-बार्शी, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 333, पुरूष 1 लाख 73 हजार 453, महिला- 1 लाख 64 हजार 2, तृतीयपंथीय -44, एकुण 3 लाख 37 हजार 499, सैनिक मतदार-563, 85 वर्षावरील मतदार- 6 हजार 839.
मतदार संघ 247- मोहोळ (अ.जा), एकुण मतदान केंद्रांची संख्या – 336, पुरूष 1 लाख 73 हजार 121, महिला- 1 लाख 58 हजार 329, तृतीयपंथीय -08, एकुण 3 लाख 31 हजार 458, सैनिक मतदार-424, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 159.
मतदार संघ 248-सोलापूर शहर उत्तर, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 289, पुरूष 1 लाख 62 हजार 467, महिला- 1 लाख 66 हजार 59, तृतीयपंथीय -46, एकुण 3 लाख 28 हजार 572, सैनिक मतदार-81, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 128.
मतदार संघ 249- सोलापूर शहर मध्य, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 304, पुरूष 1 लाख 70 हजार 509, महिला- 1 लाख 76 हजार 115, तृतीयपंथीय -53, एकुण 3 लाख 46 हजार 677, सैनिक मतदार-45, 85 वर्षावरील मतदार- 3 हजार 809.
मतदार संघ 250- अक्कलकोट, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 396, पुरूष 1 लाख 96 हजार 577, महिला- 1 लाख 86 हजार 869, तृतीयपंथीय -43, एकुण 3 लाख 83 हजार 479, सैनिक मतदार-434, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 342.
मतदार संघ 251-सोलापूर दक्षिण, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 367, पुरूष 1 लाख 95 हजार 751, महिला- 1 लाख 86 हजार 964, तृतीयपंथीय -39, एकुण 3 लाख 82 हजार 754, सैनिक मतदार-240, 85 वर्षावरील मतदार- 3 हजार 356.
मतदार संघ 252-पंढरपूर, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 357, पुरूष 1 लाख 91 हजार 464, महिला- 1 लाख 82 हजार 194, तृतीयपंथीय -26, एकुण 3 लाख 73 हजार 684, सैनिक मतदार-541, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 330.
मतदार संघ 253-सांगोला, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 309, पुरूष 1 लाख 72 हजार 704, महिला- 1 लाख 60 हजार 784, तृतीयपंथीय -05, एकुण 3 लाख 33 हजार 493, सैनिक मतदार-886, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 223.
मतदार संघ 254-माळशिरस (अ.जा), एकुण मतदान केंद्रांची संख्या – 345, पुरूष 1 लाख 80 हजार 322, महिला- 1 लाख 69 हजार 214, तृतीयपंथीय -32, एकुण 3 लाख 49 हजार 568, सैनिक मतदार-400, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 699
एकुण मतदान केंद्रांची संख्या – 3 हजार 738, पुरूष 19 लाख 71 हजार 831, महिला- 18 लाख 76 हजार 728, तृतीयपंथीय -310, एकुण 38 लाख 48 हजार 869, सैनिक मतदार-4 हजार 436, 85 वर्षावरील मतदार- 52 हजार 766.
दि. 29/10/2024 रोजी एकूण पुरूष मतदार 19,71,831, स्त्री मतदार 18,76,738 व इतर मतदार 310 असे एकूण 38,48,869 एवढे मतदार व 4436 सैनिक मतदार आहेत. जिल्हयाचा EP ratio दि. 29/10/2024 रोजी 78.67% एवढा आहे. Gender ratio हा 952 आहे. जिल्हयामध्ये 18-19 वयोगटातील एकूण मतदार 1,04,634 (2.72%) असून 20-29 वयोगटातील मतदार हे 8,10,471 इतके आहेत. 85 वर्षावरील मतदारांची संख्या हि 52,766 असून PWD मतदार संख्या हि 29,989 इतकी आहे.
सोलापूर जिल्हयामध्ये एकूण मतदान केंद्र 3738 (शहरी 1183 व ग्रामीण 2555) असून, 3723 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत.
आचार संहितेबाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी C-vigil app वापरावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांनी केले असून Cash seize करणे, liquor seize करणे तसेच इ. तत्सम कामासाठी ESMS app वापरण्यात येणार आहे.
तसेच सोलापूर जिल्हयासाठी एक Control room स्थापन करण्यात आली असून, जिल्हा स्तरावर 1950 हा toll free नंबर हा activate करण्यात येत असून त्याच धर्तीवर मतदार संघ निहाय स्वतंत्र Control room स्थापन करण्यात आलेले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी मतदार संघ निहाय एक खिडकी योजना व Suvidha प्रणालीद्वारे अर्ज सादर करणेची सोय करण्यात आली आहे.
जिल्हयातील 11 विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदवून आपले बहुमूल्य मत मतदानाद्वारे नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे…