पक्षातील नगरसेवकांचा विरोध झिडकारून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देवेंद्र कोठे यांना शहर मध्यची उमेदवारी जाहीर होताच कोठे समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष…
शिवसेना { शिंदे } गटातील अंतर्गत गटबाजीचा भाजपला फायदा...
देवेंद्र कोठेंची उमेदवारी आ.विजयकुमार देशमुखांसाठी धोक्याची घंटा…
अनेक दिवसांपासून शहर मध्य च्या जागेचा तिढा सुटत नव्हता.शहर मध्य मतदार संघ शिवसेनेसाठीच आरक्षित असून येथे कुणाचा उमेदवारी मिळणार याकडे ? विशेष लक्ष लागून राहिले होते. शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी द्यायची हाच मोठा पेच पक्ष श्रेष्ठीपुढे निर्माण झाला होता.उमेदवारी मिळण्यासाठी
शिवसेनेचे शिष्टमंडळ मुंबईत तळ ठोकून होते. आणि अखेर हा वाद संपुष्टात येत नसल्याने ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार या चर्चेला चांगलेच उधाण आले होते.
इकडे शहर मध्य मतदार संघासाठी श्रीनिवास संगा यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.भाजपाच्या नगरसेवकांनी देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला तीव्र हरकत घेतली होती.या मतदार संघासाठी अनेक नाममात्र चेहरे देवेंद्र कोठे यांना विरोध दर्शवण्यासाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त करत होते.
श्रीनिवास संगा आणि देवेंद्र कोठे यांच्यात शहर मध्यच्या जागेवरून रस्सीखेच सुरूच होती.देवेंद्र कोठे यांच्या विकास कार्याच्या अहवालावर देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांना शहर मध्य मधून उमेदवारी जाहीर केली.
शहर उत्तर मध्ये राष्ट्रवादीकडून महेश कोठेंना आणि शहर मध्य मधून देवेंद्र कोठे यांना उमेदवरी जाहीर झाल्याने पुन्हा एकदा शहरात कोठेंचे प्रस्थ विशेषत: निवणुकांपूर्वी निर्माण झाल्याचे चित्र प्रथम दर्शनी पाहायला मिळत.या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
मात्र देवेंद्र कोठे यांची उमेदवारी शहर उत्तर भाजपाचे उमेदवार व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना धोक्याची घंटा मानली जात आहे. देवेंद्र कोठे समर्थकांचा विशेष गट स्थानिक स्वराज्य निवडणुकी पूर्वी सद्यस्थितीत राजकारणात सक्रिय आहे.या गटामुळे सोलापूर महानगर पालिकेत कोठेंचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित होणार या समिकरणाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर होताच मुरारजी पेठ येथील देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर समर्थकांनी जल्लोष एकच वादा देवेंद्र दादा भारतीय जनता पार्टीचा विजय असो,जय श्री राम , देवभाऊ आप आगे बढो हम आपके साथ है च्या घोषणांनी मुरारजी पेठ परिसर दणाणून सोडला. पक्ष श्रेष्ठी यांनी दिलेल्या संधीचे सोने करू आणि शहर मध्ये भाजपा चा झेंडा नक्की फडकवु असा विश्वास देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला.आणि शहर मध्य मध्ये देवेंद्र कोठे यांनी केलेल्या विकास कामाच्या अजेंड्यावर देवेंद्र कोठेंचा सर्वाधिक मताधिक्याने विजय होईल अशा प्रतिक्रिया निडणुकांपूर्वी व्यक्त केल्या जातायत …