भाजपच्या पहिल्याच यादीत “मालक”, “बापू” आणि “दादांनाच” पुन्हा संधी ….
सोलापूर
विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना आता वेग असून विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पहिल्याच यादीत शहर उत्तर चे “मालक” अर्थांत विजयकुमार देशमुख, दक्षिण चे ” बापू” अर्थात सुभाष देशमुख , आणि विकासाचा वादा आपल्या हक्काचा “दादा”अर्थात सचिन
कल्याणशेट्टी यांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या पदरात निराशाच आली आहे . विद्यमान आमदारांनाच पुनश्च: भाजपा ने संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. उत्तर मध्ये
“मालकांनी” दक्षिण मध्ये ” बापूंनी ” तर अक्कलकोट मध्ये “दादांनी” केलेल्या विकासाच्या जोरावर तिघांनाही पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यंदाची निवडणूक ही अहवानात्मक निवडणूक असून त्या अनुषंगाने तगड्या उमेदवारांनाच भाजपाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. उमेदवारी मिळताच सोशल मीडियावर *”मालक” ,* *”बापू”* , *”दादा”* यांची विशेष क्रेझ पाहायला मिळत आहे…..