सोलापुरातील दत्त चौकातील नामांकित शाळेत बेकायदा बांधकाम …
उप अभियंता खानापुरे यांचा शासकीय कर्तव्यात चुकार पणाचा कळस चव्हाट्यावर....

सोलापूर:
सोलापुरातील गणपती घाट जवळील एका नामांकित शाळेतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी संस्थेचे टोळाच्या बोळात रहणारे संस्थेचे विद्यमान अभ्यासू सभासद यांनी या प्रकरणी तक्रार केली होती,बालहक्क संरक्षण आयोगाकडून चौकशी सुरू झाली हि सुनावणी नवीन कलेक्टर ऑफिस जवळ, नियोजन सभागृह येथे १९/०३/२०२५ रोजी तक्रारदारांनी दिलेल्या अर्जानुसार .आयोगा पुढे संस्थेचे दिग्गज नामवंत वकिल व हुकूमत चालवणारे सर्वेसर्वा .टोळाच्याबोळा जवळील तथाकथीत वकिलांकडून संस्थेची बाजु प्रभावी पणे मांडण्यांचा केविलवाणा दिशाहीन प्रयत्न आयोगा सामोर मांडण्याचा दिसून आला,तसा फारसा प्रभाव झाला नसावा, तसे ठोस असे मुद्दे व कोणताही प्रतिवाद का केला नाही, असा संशयास्पद प्रश्न निर्माण होतो. शासनाच्या नवीन नियमा प्रमाणे महानगर पालीकेची बांधकाम परवानगी घेणे आवश्यक नाही, बांधकाम परवानगी घेणे बंधनकारक नसून बेकायदेशीर पणे बांधकाम करणे हे किती उचीत ठरेल हे आगामी काळच ठरवेल ? तक्रारदारानी बाजु भक्कम पणे मांडत आयोगासमोर पुरातत्व विभागाने बांधकांम बेकायदेशीर व अनाधिकृत असल्याचे नोटीस पाठविले हे आयोगाच्या निर्दशनास आणून दिले.
त्यामुळे स्ट्रक्चरल इंजिनिअरचे सर्टिफिकेट आपोआप रद्द होते, पण स्ट्रक्चरल इंजिनिअरने स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिलेच कसे बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामाबाबत सर्टिफिकेट देता येत नाही,ही गंभीर बाब आयोगाच्या निर्दशनात आणून दिली,तसेच नगररचना विभागाने तिनही हमारती धोकादायक झालेली नोटीस मध्ये असताना एकाच इमारतीचे तेही फक्त पश्चिम भागाचे काम केल्याचे दाखवत व इतर दोन्ही हमारती अदयाप धोकादायक असल्याचे गंभीर बाब आयोगाच्या निर्देशनास आणून दिल्या तेव्हा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पुरातत्व विभागाची चौकशी करून लेखी अहवाल मागवला जाईल अशी ग्वाही तक्रारदारास दिली.
तेव्हा प्रश्न असा पडतो कि तक्रारदार वारंवार खोटया तक्रारी शासन दरबारी करत असून संस्थेची नाहक बदनामी व त्रास देत असूनही संस्थेत नामांकित कायदे पंडित वकिलाची फौज असून फौजदारी गुन्हा का दाखल करत नाही.
म्हणजे काहीतरी गडबड असू शकते ? असे सकृत दर्शनी वाटते.तेव्हा बाल हक्क आयोगाने ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू झाली . प्रचंड चर्चा असून सर्वाचे लक्ष आयोगाकडे लागून राहिले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात या गोष्टीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. की नामांकित वकील असलेल्या शाळेतून अशी गंभीर चूक कशी झाली.