crime
-: प्रेस नोट :- सोलापूर दिनांक 19.10.2024
-: प्रेस नोट :- सोलापूर दिनांक 19.10.2024
सोलापूर तालुका, पोलीस ठाणेची कामगिरी
पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणा-या अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त
11 हजार 400 लिटर गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट
160 हातभट्टी दारू, 57 प्लॅस्टिक बॅरेल व 4 रबरी टयुब जागेवरच नष्ट
एकूण 4 लाख 43 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल
—00—
आगामी विधानसभा निवडणुक -2024 शांततेत पार पाडुन निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पाडावी या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील गुळवंची येथे चोरून चालणा-या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टया उध्दवस्त करण्याच्या अनुषंगाने मा. श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल देशपांडे व श्री.कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, सुरक्षा शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोरून अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टयावर छापे टाकुन हातभट्टया उध्दवस्त केल्या आहेत.
अवैधरित्या चालणा-या देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 4 लाख 43 हजार रूपये 500 रूपये किंमतीचे त्यामध्ये 11 हजार 400 लिटर गुळमिश्रीत रसायन, 57 प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य व अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. तसेच 4 रबरी टयुब मध्ये 16 हजार रूपये किंमतीचे 160 लिटर हातभट्टी दारू जागेवरच नष्ट केली आहे.
गुळवंची येथे चोरून अवैध दारूच्या हातभट्टया उध्दवस्त केलेल्या ठिकाणी एकूण 3 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई अन्वये 03 गुन्हे दाखल केले आहेत. दाखल गुन्हयाच्या तपास पोनि/राहुल देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याचेकडुन होत आहे.
यापुर्वी देखील सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून संबंधीता विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणा-या इसमांची गोपनियरित्या माहिती संकलित करून त्या सर्वांचे विरूध्द कारवाई करण्यात येऊन संबंधीत इसमाचा पोलीस ठाणे कडील गुन्हेगारी अभिलेख पडताळुन त्यांचे विरूध्द कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची छापा कारवाई मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका,पोलीस ठाणे, श्री.कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, सुरक्षा शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे, सुरक्षा शाखा, सोलापूर ग्रामीण व सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब राठोड, सहायक पोलीस फौजदार रशीद बाणेवाले, पोलीस हवालदार पंकज महिंद्रकर, अत्तार, महिला पोलीस हवालदार वैशाली कुंभार, पोलीस नाईक गुंड, मुल्ला, महिला पोलीस अंमलदार खोत, विकास चंदनशिवे, खंडु माळी व आर.सी.पी. पथकातील अंमलदार यांनी पार पाडली आहे.
*****
प्रति,
मा.संपादक,….
2/-सदरची बातमी आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेस विनंती आहे.