बाबा सिद्धीकी यांच्यावरील भ्याड हल्लाचा तीव्र निषेध, सूत्रधार शोधून काढून कडक शासन करा -जिल्हाध्यक्ष संतोष पवार…
राष्ट्रवादीच्या वतीने स्व बाबा सिद्धीकी यांना विनम्र आदरांजली..

सोलापूर
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या निधनाची अत्यंत दुःखद घटना घडली. एक कर्तृत्ववान नेता त्यांनी पक्षासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी प्रस्थापित केलेले आदर्श कायम लक्षात राहतील.बाबा सिद्धीकी अनेकांसाठी मार्गदर्शक होते, त्यांनी त्यांच्या दृष्टिकोन आणि समर्पणाने अनेकांना प्रेरित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरच्या वतीने स्व.बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्याचा निषेध केला ह्या हत्येमागे जे कोणी सूत्रधार असतील त्यांनाही शोधून अटक करावी आणि आरोपीना कडक शासन करावे असा शोक जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केला …
स्व बाबा सिद्धीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन फुले वाहून अभिवादन करण्यात आले दोन मिनिट स्तब्ध होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली..
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माझी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते महेश निकंबे, अल्पसंख्यांक राज्यसचिव फारुक मटके, जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाफ , महिला शहर अध्यक्ष संगीता जोगदनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष आमिर भाई शेख , शहर युवती अध्यक्ष किरण माशाळकर, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का , मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादी राजे, वाहतूक संघटना शहराध्यक्ष इरफान शेख, डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप माने ,वैद्यकीय सेलचे शहराध्यक्ष बसवराज कोळी श्यामराव गांगर्डे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष वैभव गंगणे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, राज बिटला, संदीप पाटेकर ,मुजफ्फर बागवान सरफराज बागवान,अल्पसंख्यांक दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी, अल्पसंख्यांक मध्य विधानसभा अध्यक्ष मुसेब शेख, अल्पसंख्यांक उत्तर विधानसभा अध्यक्ष नवाज हुंडेकरी, अल्पसंख्याक दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष. मुहिज मुल्ला , अल्पसंख्यांक दक्षिण विधानसभा संघटक झहीर शेख, सरचिटणीस तन्वीर गुलजार, अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष समदानी मत्तेखाणे, इस्माईल शेख नाविद शेख, मौला भाई शेख , मैनुद्दीन इनामदार , जैद बागवान , रहीम शेख, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…