राम जाधव यांच्या पाठपुराव्याला यश पोलिस प्रशासनाने दिली नवीन मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी परवानगी….

सोलापूर
शिवजयंती पार्श्वभूमीवर अनेक नवीन मंडळे यंदाच्या ही वर्षी मोठ्या जल्लोष पूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्राण प्रतिष्ठापना करणार असून त्या अनुषंगाने मंडळानी पोलिस प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागितली होती. पण पोलिस प्रशासनाने नवीन मंडळांना परवानगी नाकारली होती.यानंतर मराठा आंदोलक राम जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत मंडळांना परवानगी नाकारल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदान करणार असल्याचा संतप्त इशारा पोलिस प्रशासनास दिला होता. राम जाधव यांच्या या भूमिकेनंतर व श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने याबाबत पुढाकार घेऊन पोलिस आयुक्तांची व उपायुक्तांची भेट घेऊन नवीन मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदना द्वारे केली होती.
राम जाधव यांनीही आमदार विजयकुमार देशमुख भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची भेट घेऊन पोलिस प्रशासनास परवानगी मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निवेदन दिले . यानंतर नरेंद्र काळे यांनी स्वतः पोलिस आयुक्तांची भेट घेतली .यानंतर पोलिस प्रशासनाने नवीन मंडळांना परवानगी देण्याचे मान्य केले. पोलिस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे तमाम शिवभक्तांनी स्वागत करत आभार मानले.
राम जाधव यांनी शिवभक्तांसह पोलिस उपायुक्त डॉ विजय कबाडे यांची भेट शिवराज्याभिषेक ची फोटो फ्रेम सप्रेम भेट दिली.यावेळी पोलिस उपायुक्त डॉ.विजय कबाडे यांना कायद्याच्या चौकटीत राहून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू.पोलिसांनी एक बेस आणि टॉप ला व कंटेनर तसेच अत्यावश्यक साहित्यासाठी ट्रॅक्टर आणि इतर साधने वापरण्यास परवानगी दिली आहे .
अती संविदेनशील ठिकाणी म्हणजे हॉस्पिटल च्या परिसरात डॉल्बी बंद राहील. मध्यवर्ती महामंडळाने डॉल्बीसाठी नियोजित केलेल्या मार्गाचाच वापर करू.छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा इतर राजकीय फोटोचा मोठे नसल्याने तो त्याचा वापर होणार नाही.प्रत्येक मंडळ नियमाशी बांधिल राहूनच मिरवणूक काढणार असल्याचे राम जाधव म्हणाले.
यावेळी सुहास कदम, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे कार्याध्यक्ष पंकज काटकर ,रोहित खताळ , पवन आलुरे यांची उपस्थिती होती…