india- worldmaharashtrasocialsolapur

वाहनांची नवीन मालिका चालू, आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवता येणार…

सोलापूर

दिनांक 9( जिमाका)- प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे लवकरच परिवहन संवर्गांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठया प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व ब-याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो.नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या परिवहन संवर्गातील वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरून हवे असतील त्यांनी दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वेळेत विहीत नमुन्यात अर्ज करावा.
विहीत नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी,पत्याचा पुरावा, आधार लिंक, मोबाईल नंबर, ओळखपत्र, पैनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा. सदर डीडी फक्त ” Dy R.T.O. Solapur” यांच्या नावे नॅशनलाईज /शेडयुल्ड बैंकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील.
एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ०५.०० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२:०० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा.लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये ३००/- पेक्षा कमी रकमेचा नसावा. सदर डीडी फक्त “Dy R.T.O. Solapur “यांच्या नावे नॅशनलाईज शेडयुल्ड बैंकेचा असावा, या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील. डीडी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा.
१५ऑक्टोबर रोजी दुपारी ०४.०० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या उपस्थित पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल, कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही., वाहन धारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डीडी जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही. असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी कळविले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia