crimemaharashtrapoliticalsocialsolapur

तक्रारीवरून गुन्हा दाखल करावयाचा झाल्यास गैरतक्रारदारास ७२ तास आगाऊ नोटीस देणेचा न्यायालयाचा आदेश….

 

सोलापूर

 

येथील रहिवासी सागर भास्कर थोरात, वय ३२ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. ब्लॉक नं. १३, रेल्वे लाईन्स, सोलापूर. याने दाखल केलेल्या जामीन अर्जाच्या प्रकरणामध्ये, तक्रारदार रणशृंगारे यांचे तक्रारीवरून सागर थोरात यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावयाचा झाल्यास त्यांना ७२ तासाची आगाऊ नोटीस देण्याबाबतचे स्पष्ट आदेश सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने क्राईम ब्रेन्च सोलापूर यांना दिले.

 

 

 

याची हकीकत की, सोलापूर येथील व्यावसायिक श्री. सागर थोरात यांचेविरूध्द श्री. आर. एल. रणशृंगारे यांनी फसवणुकीबद्दल एक तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशी गुन्हे शाखा सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय करीत आहे. त्यामध्ये सागर थोरात यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. म्हणून त्यांनी अॅड. शशि कुलकर्णी यांच्यामार्फत सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. सदरचा अर्ज सुनावणी वेळी आला, त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने समक्ष हजर राहून सद्यस्थितीत गुन्हा दाखल नाही, पंरतु चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले.

 

 

 

 

यावरून अॅड. शशि कुलकर्णी यांनी, प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वी ७२ तासाची आगाऊ नोटीस देण्याची मागणी केली. सदरची मागणी विचारात घेऊन न्यायालयाने, क्राईम ब्रेन्च सोलापूर यांनी आर. एल. रणशृंगारे यांच्या तक्रारीवरून सागर थोरात यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावयाचा झाल्यास, त्यांना ७२ तासाची आगाऊ नोटीस द्यावी, अशाप्रकारचा आदेश सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने पारित केला.

 

 

 

सदर कामी अर्जदार/गैरतक्रारदार सागर थोरात तर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. देवदत्त बोरगांवकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅड. आदित्य अदोने आणि सरकारतर्फे अॅड. आनंद कुर्डकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia