सावंत व राठोड यांना पुन्हा मंत्री मंडळात संधी मिळण्यासाठी शिवसैनिकांच्या वतीने CNS हॉस्पिटल समोरील दत्त मंदिरात महाआरती संपन्न….

सोलापूर
लोकशाहीच्या मनातील सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधी सोहळ्यानंतर आता १४ तारखेला पार पडणाऱ्या मंत्री मंडळ विस्तारात पुन्हा एकदा तानाजी सावंत व बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना संधी मिळण्यासाठी दत्त जयंतीच्या पार्श्भूमीवर देगाव येथील CNS हॉस्पिटल समोरील दत्त मंदिरात शिवसैनिकांच्या वतीने महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.
या महाआरतीचे आयोजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.महाआरती नंतर उपस्थित शिवसैनिकांनी दत्त महाराजांकडे तानाजी सावंत व संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्यासाठी नतमस्तक होत साकडे घातले. यानंतर भक्त गणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .याला भक्त गणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण , महिला आघाडी उप शहर प्रमुख अनिता गवळी, पूजा नवनाथ चव्हाण ,अंजना चव्हाण , मनीषा पारवे , यशोदा कांबळे , पारुबाई चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…