अमोल बापूंनी लावली प्राध्यापक शिवाजी सावंत यांना मध्य मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी सर्वोतोपरी ताकद…

सोलापूर
शहराच्या मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या मध्य मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचालींना वेग आला आहे . शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपापल्या स्तरावर सर्वतोपरी ताकद पणाला लावली आहे. या मतदारसंघात मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष निधी आणत विकास कामांवर भर दिला आहे मनीष काळजी हे मध्य मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत तर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनीही प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्यासाठी मध्य मतदारसंघातील स्थानिक? नागरिकांचे जबरदस्त नेटवर्क वाढवला आहे. सध्य स्थितीत जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याही नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आलय. मात्र अमोल बापूंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्यासाठीच मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली करत असल्याच्या घडामोडी समोर आल्या आहेत. प्राध्यापक शिवाजी सावंत हे गेल्या चार-पाच महिन्यांपासून मध्य मतदारसंघात तळ ठोकून आहेत त्यात बापूंची ताकद सरांच्या पाठीशी असल्याने हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण कार्यक्रम निमित्त सोलापुरात येत आहेत”मध्ये साठी इच्छुक असणाऱ्या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपापल्या स्तरावर शक्ती प्रदर्शन दाखवण्यास सुरुवात केली आहे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार ? याकडे आता पक्षातील प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांसह इतर विविध राजकीय पक्षाच्या
लोकप्रतिनिधींचे या घडामोडींकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. येणारा काळात कोणाला उमेदवारी मिळेल ? कोण निवडणूक लढवेल ? मध्य मतदारसंघाचा पात्र उमेदवार कोण ? यासह विविध प्रश्न उपस्थित केले जातायत?…
सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत