crimemaharashtrasocialsolapur

अवैध मद्यविक्री विरोधात धडक कारवाई मध्ये ९८ लाखांचा मुद्येमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी…

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री. सागर धोमकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोलापुर जिल्हयाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी कार्यभार स्विकारल्यापासुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने दि. १९/०८/२०२४ ते दि. ०१/१०/२०२४ या कालावधीत अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क सोलापुर विभागात संयुक्तरित्या विशेष मोहिम राबविण्यात आली. सदरच्या एकूण २६९ गुन्हे नोंद करण्यात आले. यात २११ आरोपींवर कारवाई करण्यात आली असुन २६ वाहनांसह एकूण रु. ८०,४३,३३६/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये मौजे बोरामणी ता. दक्षिण सोलापुर गावाच्या हद्दीत दि.२०/०९/२०२४ रोजी केलेल्या कारवाईत ४४२० इतकी लि. तयार हातभट्टीची दारु व १०,००० इतके लि. रसायन व हातभट्टी निर्मिती साठी लागणारे साहित्य असा एकुण रु.८,३५,६०० किमतीचा मुद्येमाल नाश करण्यात आला. तसेच दि ०१/१०/२०२४ रोजी मौजे. लवंगी ता. मंगळवेढा येथे गोवा बनावटीचे मद्य वाहतुक करीत असताना २ इसमांवर कारवाई करुन त्यांच्या ताब्यातुन ३६ ब.लि. गोवा बनावटीचे विदेशी मद्य व एका दुचाकीसह एकुण रु. ८३,६३५/- इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच दिनांक ०२ आक्टोबर २०२४ पासुन महात्मा गांधी सप्ताह सुरु झालेला असुन दिनांक ०२-१०-२०२४ ते दि ०३-१०-२०२४ या कालावधीमध्ये एकुण ४३ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ३१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मध्ये १३४० लि. हातभट्टी दारु, २०,३०० लि. गुळ मिश्रीत रसायन यासह दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा एकुण १० वाहनासह रु.१८,२८,१९८/- इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा महात्मा गांधी सप्ताह हा दि ०८ आक्टोबर २०२४ पर्यंत असुन उर्वरित कालावधीतही अशा प्रकारच्या कारवाया विभागामार्फत सुरु राहणार आहेत.

दिनांक १९-०८-२०२४ ते दि ०३-१०-२०२४ या कालावधीत ३१२ गुन्हे नोंद करण्यात आले असुन यात २४२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असुन ३६ वाहनांसह एकुण रु.९८,७९,५३४/- इतक्या किंमती चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे..

सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक श्री.एस. आर. पाटील, निरीक्षक श्री. जे.एन. पाटील, ओ.व्ही. घाटगे, पंकज कुंभार, एस.जी.भवड, आर.एम.चौरे, बी.एम. बामणे, दुय्यम निरीक्षक श्रीमती. अंजली सरवदे, धनाजी पोवार, रमेश कोलते, सुखदेव सिद, समाधान शेळके, दत्तात्रय लाडके, श्रीमती श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बापु चव्हान, बाळु नेवसे, सौरभ भोसले, रविंद्र भुमकर, प्रभाकर कदम, गणेश कुदळे, श्रीमती मृदुला बहुधान्ये, शिवकुमार कांबळे, अमित नांगरे, एम.यु.वाघ, एस.एस.गुठे, लक्ष्मण भागुजी लांघी सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. एस.पी.चव्हान, एम.बी.जाधव, जी.व्ही. भंडारे, एस.ए. बिराजदार, मुकेश चव्हान, व्ही.एस. पवार, व सर्व जवान संवर्गातील कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी अवैध मद्य विक्री / वाहतूक विरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारण्यात येणार असुन अवैध मद्य विक्री/वाहतूक विरोधात विविध पथके नियुक्त केले आहेत, सदर पथके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत.

अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक

८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती. भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button