crimepoliticalsocialsolapur

पंजाब तालीम परिसरात दोन गटात दगडफेक….

पोलिस उपायुक्त डॉ विजय कबाडे अन्य अधिकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल ....

सोलापूर

*परिस्थिती नियंत्रणात….*

रविवारी संध्याकाळी ८ ते ८:३० वाजण्याच्या सुमारास वाहनाला साइड का दिली नाही ? यावरून दोन गटात हाणामारी झाली .त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले .यावेळी त्या परिसरात असणाऱ्या वाहनांची दुकानांची अज्ञातांनी मोडतोड केली. घटनेवेळी या परिसरात एकच पळापळ सुरू झाली. या दगडफेकीत सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. मात्र परिसरात सर्वत्र दगडांचे थर पाहायला मिळाले. अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. दुकानांवर दगडफेक करण्यात आली.

त्यामुळे त्या परिसरात असणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकाने तात्काळ बंद केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे , फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे त्यांच्या पथकासह दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. घडलेली हकीकत पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे यांनी माध्यमांना सांगितली.

या दगडफेकीमुळे पत्रा तालीम , मल्लिकार्जुन मंदिर , बाळीवेस, चौपाड , शिंदे चौक या भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. पोलिसांकडून या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दोन गटांपैकी एका गटाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून जलद गतीने केला जातोय. या घटनेमुळे सोलापुरात चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलय….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button