maharashtrapoliticalsocialsolapur

शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची धाराशिव भटक्या विमुक्त समाज व पारधी समाज बांधवांनी घेतली भेट….

भेटीचे कारण नेमके काय ? वृत्त सविस्तर

सोलापूर

 

धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजातील व पारधी समाजातील प्रतिनिधी यांनी महिला सह बहुसंख्येने सोलापूर येथील शिवसेना शहर व जिल्हा संपर्क कार्यालय येथे येऊन मा. अमोल बापू शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या व गंभीर प्रश्न अत्यंत पोटतीडकेने मांडले.
घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही.

 

 

समाजासाठी शासनाने ज्या काही लाभार्थी योजना जाहीर केलेल्या आहेत त्यापासून ते अनेक वर्षापासून वंचित आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी बचत गट, गायरान जमीन, गायरान जमीन ज्या कब्जे वहि वाटीत आहेत त्यावर वारसा हक्काने पुढे नावे लावण्यामध्ये येणाऱ्या अडचणी असे एक ना अनेक गंभीर प्रश्न व समस्या अमोल बापू शिंदे यांच्या समक्ष मांडल्या.

 

 

 

यावर अमोल  शिंदे यांनी मार्गदर्शन करीत असताना उपस्थित असलेल्या दोन्ही समाज बांधवांना प्रथम आपल्या सर्व दैनंदिन समस्या व प्रश्न यांची सोडवणूक करावयाची असेल तर सर्व प्रथम समाजाचे संघटन मजबूत करा शिक्षणाला महत्त्व द्या.
शासकीय नोकऱ्यातील स्वतःच्या समाजासाठी जागा कुठे रिक्त आहेत यासाठी सदैव जागृत रहा स्वतःच्या हक्काच्या नोकऱ्या मिळण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा, स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः सक्षम व्हा. असे अतिशय अनमोल मार्गदर्शन सर्व उपस्थित बांधवांना केले.

 

 

 

 

तसेच धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील प्रश्ना बाबत प्रतापजी सरनाईक  परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धाराशिव जिल्हा यांना समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या मागणीचे निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी भटक्या विमुक्त समाजाचे धाराशिव व पंढरपूर चे प्रतिनिधी अनेक समाज बांधव व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button