अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांची अवैधरीत्या गॅस भरणाऱ्या स्थानकावर सलग दुसऱ्यांदा बेधडक कारवाई ….

सोलापूर
अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर ओंकार पडोळे यांच्या कार्यालयात शहरातील विविध ठिकाणी घरगुती गॅसचा वाहनांमध्ये अवैध्य रित्या वापर होत असल्याबाबतची तक्रार विभागीय जनसंपर्क अधिकारी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यांनी दिले होते. सदर तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाची नेमणूक करून सोलापूर शहरातील एसटी स्टँड,रेल्वे स्टेशन परिसर,सैफुल,अमन हॉटेलच्या बोळात, अक्कलकोट रोड लक्ष्मी मंदिर, विनायक नगर, जुना कुंभारी गाळा,नई जिंदगी व शनी मंदिर समोर अक्कलकोट रोड, क्रोमा शोरूम च्या मागे,सितारा चौक, विमानतळ अशा विविध ठिकाणी गॅस सिलेंडर व घरगुती गॅस सिलेंडर वाहनांमध्ये प्रत्यक्षात अवैधरीत्या गॅस भरत असताना आढळून आले.
यावेळी भरारी पथकाने अचानकपणे छापा टाकताच अवैद्य रीत्या गॅस भरणाऱ्यांची धाबे दणाणले, सदर कारवाईत एचपी कंपनीचे तीन सिलेंडर,दोन इलेक्ट्रिक मोटार,दोन इलेक्ट्रिक वजन काटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. यावेळी परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके, अनिल गवळी, नितीन वाघ, प्रफुल नाईक,पुरवठा निरीक्षक राजेश यमपुरे,सज्जन भोसले तसेच पोलीस शिपाई विशाल चव्हाण पोलीस हवालदार बालाजी चव्हाण यांनी हे कामगिरी पार पाडली.
जेलरोड पोलीस स्टेशन येथे सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल नोंद करण्याचे कामकाज चालू होते.मागील डिसेंबर महिन्यात अशीच कारवाई झाल्याने सलग दुसऱ्यांदा होणाऱ्या कारवाईमुळे अवैधरित्या गॅस भरणाऱ्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहे.