जागेच्या वहिवाटीवरून तरुणाला “तुझा मॅटर कोल्झ” करतो अशी धमकी देत प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी….
घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दिली भेट ...

सोलापूर
यात थोडक्यात अशी की , यातील फिर्यादी सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे राहणार वय ३७ घर नंबर ८१४ उत्तर कसबा बाळीवेस सोलापूर व या घटनेतील आरोपी राहुल उर्फ संतोषकुमार चंद्रशेखर बागदुरे यांच्यामध्ये असलेल्या वडिलोपार्जित जागेच्या वहिवाटीवरून मे.न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.या प्रकरणाचा निकाल अद्याप में.न्यायालयात लागला नसल्याने सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे व राहुल उर्फ संतोषकुमार चंद्रशेखर बागदुरे यांच्या सातत्याने शाब्दिक वाद होत असतात.या वादातूनच आरोपी राहुल उर्फ संतोषकुमार चंद्रशेखर बागदुरे याने फिर्यादी सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे यांच्यावर व सिद्धेश्वर यांच्या आईंवर प्राणघातक हल्ला केला.मंगळवारी फिर्यादी हे कला विहार प्रिंटिंग प्रेस येथे असताना आरोपी संतोषकुमार हा त्या ठिकाणी आला व त्याने पूर्वीच्या प्रकरणावरून सिद्धेश्वर यांच्यासमवेत शाब्दिक वाद घातला.
यावेळी फिर्यादी सिद्धेश्वर व त्यांचे मित्र गोपाळ नंदकिशोर गायकवाड यांनी त्यांना ऑफिस मध्ये वाद घालू नका असे म्हणाले असता आरोपी संतोषकुमार याने फिर्यादी सिद्धेश्वर यांना तू बाहेर चल तुला हिसका दाखवतो अशी धमकी दिली.फिर्यादी सिद्धेश्वर हे ऑफिस बाहेर आले असता आरोपी संतोषकुमार त्याच्या जवळ असलेल्या लोखंडी धारदार चाकूने सिद्धेश्वर यांना आज “तुझा मॅटर कोल्झच” करायचा आहे असे म्हणून सिद्धेश्वर यांच्या गळ्यावर डाव्या बाजूस वार करून गंभीर जखमी केले . सिद्धेश्वर हे त्या घटनेवेळी उपस्थित असलेल्या लोकांना ” वाचवा ,वाचवा “ असे म्हणत असताना आरोपी संतोषकुमार याने खबरदार आमच्या मध्ये याल तर असे म्हणून सिद्धेश्वर यांना वाचविण्यासाठी येणाऱ्या उपस्थित लोकांवर ही हल्ला करू लागला.
आणि आमच्या दोघांमध्ये येणाऱ्यांना ही त्यांचा जीव गमवावा लागेल असे मोठ्या आवाजात म्हणाला . फिर्यादी सिद्धेश्वर बागदुरे हे आरोपी संतोषकुमार बागदुरे यांच्या तावडीतून, कसेबसे आपला जीव मुठीत घेऊन निसटून जात असताना आरोपी संतोषकुमार याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने फिर्यादी सिद्धेश्वर यांच्या डाव्या छातीवर व पाठीवर वार करून जबर जखमी केले. या घटनेबाबतीत सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संतोषकुमार चंद्रशेखर बागदुरे याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ ,३५१ (२) ,(३) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१),(३),१३५ फौजदारी सुका १९३२ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
व आरोपीस अटक केली.पोलिसांनी आरोपीस मे.न्यायालयात हजर केले असता आरोपी संतोषकुमार यास एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिस उपायुक्त परिमंडळ डॉ.विजय कबाडे,सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १ पोमण ,फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी भेट दिली .या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करीत आहेत…



