बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा तर्फे वकिलांकरिता कार्यशाळा व विनामूल्य पुस्तकांचा वितरण सोहळा थाटात संपन्न…
सोलापूर
दि. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या विद्यमाने आज रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री विनय जोशी व सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री सलमान आझमी यांच्या उपस्थितीत वकिलांसाठी कार्यशाळा व नवोदित वकिलांसाठी बार कौन्सिल तर्फे दिवाणी व फौजदारी पुस्तकांचा मोफत वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या विद्यमाने वकिलांकरिता कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री विनय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सलमान आझमी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष तथा सदस्य अॅड मिलिंद थोबडे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये बार कौन्सिलमार्फत वकील वर्गांकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यामागचा उद्देश सांगून बार कौन्सिलमार्फत करण्यात येत असलेल्या कार्यांची माहिती दिली
कार्यक्रमांमध्ये बार कौन्सिलचे सदस्य अॅड गजानन चव्हाण यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल ही भारतात सर्वाधिक कार्यक्रम घेणारी बार कौन्सिल आहे असे सांगितले. बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड संग्राम देसाई यांनी बार कौन्सिलच्या मुंबई येथील अॅडव्होकेट अॅकॅडमीचे २८ तारखेला भूमीपूजन कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगून बार कौन्सिल वकिलांच्या हितासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणामध्ये न्यायमूर्ती श्री विनय जोशी यांनी बार कौन्सिल व अॅड मिलिंद थोबडे यांचे कार्याबद्दल कौतुक करून नवीन कायद्याबद्दल माहिती दिली व न्यायप्रक्रियेमध्ये नवीन कायद्यामुळे झालेल्या बदलांची माहिती देखील देऊन नवोदित वकिलांना यशस्वी वकील होण्याकरिता मार्गदर्शन केले व कोर्टरुम एक उत्कृष्ट शिक्षक आहेत असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सलमान आझमी यांनी नवोदित वकिलांनी जेष्ठ वकिलांचे कामाचे निरीक्षण करुन तयार व्हावे असे सांगून वकीलवर्ग न्यायव्यवस्थेचे भविष्य असून नवोदित वकीलांनी बार कौन्सिल तर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेतून ज्ञानार्जन करुन घ्यावे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड सुदीप पासबोला यांनी उलटतपास कौशल्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्याबद्दल चर्चासत्रामध्ये अॅड महेश अग्रवाल, जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीपसिंग राजपूत, अॅड रितेश थोबडे यांनी इतर मान्यवरांसह मार्गदर्शन केले.
अॅड मिलिंद थोबडे यांनी कार्यक्रमात बार कौन्सिल तर्फे नवोदित वकीलांकरीता तयार करण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी पुस्तकाबद्दल माहिती देऊन नवोदित वकीलांना प्रत्येकी रु. 3000 चे हँडबुकचे विनामूल्य वाटप करण्याची योजना जाहीर केली व जवळपास 400 वकीलांना मोफत हँडबुकचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड वैशाली बनसोडे व अॅड श्रेया देशपांडे यांनी केले तर बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड विवेकानंद घाडगे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, सोलापूर बारचे अध्यक्ष अॅड अमित आळंगे यांचेसह 1200 वकीलांची उपस्थिती होती…