“जगावं की मरावं ” “सरकार ” आमच्या रोजगार निर्मितीचा प्रश्न मार्गी लावा लाडका भाऊ योजनेच्या लाभार्थ्यांची राज्य सरकारकडे आत्मक्लेश आंदोलन करून लक्षवेधक मागणी…
तोंडावर काळी फीत बांधून युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्याकडून पूनम गेट येथे आक्रमक आंदोलन ...

राज्य शासनाच्या लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थि कडून शुक्रवारी विविध मागण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.निवेदनात नेमक्या मागण्या कोणत्या चला तर खालील प्रमाणे जाणून घेऊ?…
विधानसभा निवडणुकी पूर्वी युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली होती . या योजनेचा कालावधी फेब्रुवारी मध्ये पूर्ण होत आहे . या योजनेचा राज्यातील बहुसंख्य प्रशिक्षणार्थींना विशेष लाभ झाला .त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला .मात्र आता या योजनेचा कालावधी फेब्रुवारी या महिन्यातच पूर्ण होत असल्याने पुनश्च: बेरोजगार युवकांच्या उपजीविकेचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित होत आहे . या योजनेमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न राज्य सरकार मुळे मार्गी लागला होता . मात्र या योजनेचा कालावधी याच महिन्यात संपुष्टात येत असल्याने ” जगावं की मरावं” ” सरकार” असा प्रश्न युवक – युवतींमधून उपस्थित केला जातोय . त्यामुळे आता प्रशिक्षणार्थी वर आत्मक्लेश आंदोलनाची वेळ आली आहे.तरी ही योजना बंद न करता बेरोजगार युवकांना रोजगार उत्पन्न होण्यासाठी राज्य सरकारने विशेषत: लक्ष घालावे अन्यथा हे आत्मक्लेश आंदोलन यापुढे सुरूच राहील असा इशारा युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांकडून दिला जातोय …