maharashtrapoliticalsocialsolapur

देशा अंतर्गत अत्यावश्यक सेवा अन्न धान्य माल आणि प्रवाशी वाहतूक करणारा चालक हा देशाच्या दळणवळणचा कणा आहे ….जिल्हाध्यक्ष संतोष पवार

चालकों के सन्मान में अजितदादा मैदान मैं...

17 सप्टेंबर चालक दिनानिमित्त 111चालकांना चालक सेवा सन्मान पुरस्कार

एस टी महामंडळाचे ST चालक रुग्णावहीका चालक घन्टागाडी चालक अग्निशामक चालक ,रिक्षा चालक मार्केट यार्डातील मालवाहतूक चालक यांचा विशेष चालक सेवा सन्मान…

आज 17 सप्टेंबर वाहन चालक दिवस. त्यानिमित्त विविध स्तरातील वाहन चालकांचा गौरव सन्मान सोहळा सोलापूर बस स्थानक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटार मालक कामगार वाहतूक सेल व T.V.S क्रेडिट सर्विस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला श्री गणरायाच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पाहार घालून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान
मोटार वाहन निरीक्षक शितल कुमार कुंभार,बस स्थानक आगार व्यवस्थापक उत्तम झुंदळे भारत पेट्रोलियमच्या जयश्री बोरकर मोटार वाहन निरीक्षक कुमार तांदळे, सिद्धाराम पांढरे, चैतन्य गावडे, NHAI TVS क्रेडिट लिमिटेड महाराष्ट्र हेड कस्तुभ देवधर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाफ राष्ट्रवादी
युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख , महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला आघाडी समन्वयक शशिकला कस्पटे ,युवती अध्यक्ष किरण माशाळकर सचिव प्राजक्ता बागल , दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार,
अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख, कार्याध्यक्ष संजीव मोरे, उपाध्यक्ष आयुब शेख , सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, संस्कृती व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष डॉ. संदीप माने , OBC सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद , दिव्यांग M.M. इटकळे , सरचिटणीस प्रकाश मोटे ,सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे , कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे , इम्रान रंगरेज हमीद बागवान मुज्जो शेख फिरोज शिवणगी अर्जुन माळी गणेश पवार आणि शेख वीरेश मदगिरी,TVS क्रेडिट लिमिटेड सोलापूर प्रमुख मशाक मुल्ला, रंजीत कडलास्कर यांची उपस्थिती होती .

व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा याप्रसंगी पार पडला.
या सत्कार नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो एकच वादा आता फक्त अजितदादा विकासाचा वादा अजितदादा वाहन चालकोंके सन्मान में अजितदादा मैदान मैं, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
प्रस्ताविकेत आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटार चालक मालक कामगार वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना समाज घटकात महत्त्वाचा घटक म्हणजे वाहन चालक. या वाहनचालकांचा सन्मान होणं आज काळाची गरज आहे वाहन चालक दिनानिमित्त आज ती संधी आपल्याला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटार मालक कामगार वाहतूक सेल आणि टीव्हीएस क्रेडिट लिमिटेड सोलापूर यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे मनोगत व्यक्त करत व्यासपीठावरील मान्यवरांचा स्वागतहार्य भाषण याप्रसंगी इरफान शेख यांनी केल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवर ज्याप्रमाणे भारताचे जवान अहोरात्र संरक्षण करत असतात त्याचप्रमाणे देशातील चालक हा देशाच्या अंतर्गत दळन वळणचा कणा आहे अन्न धान्य त्याचबरोबर अत्यावश्यक माल वाहतूक करून तसेच प्रवाशी वाहतूक चालक हा आपले कर्तव्य बजावत असतात . आयोजक इरफान शेख यांनी या मोटार चालक-मालक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी यासाठी हा उपक्रम घेऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे या दिनानिमित्त सर्वच पुरस्कर्त्यांना शुभेच्छा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील मोटार वाहन निरीक्षक शितल कुमार कुंभार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटर चालक-मालक कामगार वाहतूक सेल यांच्या वतीने हा कार्यक्रम घेऊन मोटर चालक मालक कामगार वाहतूक यांच्या कार्याची दखल घेऊन हा उपक्रम घेतला समाजात एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला हाच आदर्श प्रत्येक राजकीय पक्षांनी , सामाजिक संघटनांनी घ्यावा असेही आवाहन केलं…

बस स्थानक आगार व्यवस्थापक उत्तम झुंदळे यानी आपल्या मनोगतात चालक सन्मानाच्या या उपक्रमांचे कौतुक केले बस चालक फक्त प्रवासी घेऊन जात नाहीत तर 50 कुटुंब घेऊन जात असतो त्यांना सुरक्षित घरी पोहचविण्याची जबाबदारी चालक आपले कर्तव्य म्हणून पार पाडतो अशा सर्व चालकांना शुभेच्छा दिल्या..

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन कांबळे ,अमोल माळी, हमीद बागवान, मुज्जो शेख, इमरान रंगरेज TVS क्रेडिट लिमिटेडचे विशाल इरशेट्टी अवधूत पवार संभाजी जगताप यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास पुरस्कर्ते व यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button