सोलापूर विद्यापीठ 34 व्या अधिसभा बैठकीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे व महेश चोप्रा यांच्यावर चौकशी समिती व परीक्षा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय…
(सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी उठवला आवाज)...

सोलापूर
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 34 व्या अधिसभा बैठकीत सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी पीएचडी वर्क पेट परीक्षा आठ मध्ये माजी मंत्री परिक्षार्थी लक्ष्मण ढोबळे व दयानंद महाविद्यालय,सोलापूर सचिव महेश चोप्रा यांनी बेकायदेशीर कागदपत्रे व परिक्षा नियम डावलून परीक्षा दिली होती.त्यांची कागदपत्रे सभागृहात दाखल केल्यानंतर चौकशी समिती नेमण्याचा व निकाल स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला.
अधिसभा बैठकीचे अध्यक्ष कुलगुरू डॉ.प्रकाश महानवार होते.या बैठकीत सभागृहात प्रश्नोत्तोरच्या तासामध्ये सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी दोन परिक्षार्थी परिक्षा फॉर्म भरताना दिव्यांग तपशीलामध्ये शासकीय रूग्णालयाचे प्रमाणपत्र जोडण्याऐवजी खाजगी हॉस्पीटलचे जोडले गेले हे निदर्शनास आणले.त्यावेळेस विद्यापीठ अधिकारी यांच्या कडून समाधान उत्तर न आल्याने सिनेट सदस्य गणेश डोंगरे व सभागृहातील सिनेट सदस्य यांनी चौकशी समिती, परिक्षा निकाल राखीव ठेवावा.तसेच ज्या विद्यापीठ अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे कागदपत्राची पडताळणी न करता परिक्षेस बसण्यास परवानगी दिली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी जाहीर केले.