maharashtrasocialsolapur
वृषाली चालुक्य यांची भाजयुमो प्रदेश सरचिटणीस निवड…

सोलापूर
भारतीय जनता पार्टीची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी सोलापूरच्या युवती वृषाली चालुक्य यांची निवड करण्यात आलेली आहे. निवडीचे पत्र भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी वृषाली चालुक्य यांना कालरोजी मुंबई येथे प्रदान केले.
वृषाली चालुक्य यांनी यापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहर अध्यक्ष हि जबाबदारी पार पाडलेली असून सध्या इंदिरानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन आहेत.
त्यांच्या निवडीमुळे त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाषबापू देशमुख, माजी जिल्हा सरकारी वकील अँड संतोष न्हावकर, अँड मंजुनाथ कक्कलमेली यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.