10.83 कोटीच्या जी.एस.टी प्रकरणी व्यापारी लड्डा बंधूंना जामीन मंजूर…

सोलापूर–
येथील व्यापारी एस. आर. एल. कंपनीचे संचालक श्रीकांत सुरेंद्रकुमार लड्डा व लक्ष्मीकांत सुरेंद्रकुमार लड्डा यांना 10.83 कोटीच्या जी.एस.टी. प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे. जे. मोहिते सो यांनी सशर्त जामीन मंजूर केला.
यात थोडक्यात हकीकत अशी की, एस आर एल इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक श्रीकांत लड्डा व लक्ष्मीकांत लड्डा यांना दिनांक 08/01/2025 रोजी जी.एस.टी. कार्यालय सोलापूर, यांनी 10.83 कोटीच्या आय.टी.सी (जी.एस.टी) प्रकरणी अटक केली होती. सदर कामी व्यापारी लड्डा बंधू यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एडवोकेट श्री शशी कुलकर्णी ऍडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांचे मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.
सदर जामीन अर्जाची सुनावणी श्री जे. जे. मोहिते सो यांच्या कोर्टासमोर झाली. सदर सुनावणी वेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवादकेला की, लड्डा बंधू हे प्रतिष्ठित व प्रामाणिक व्यापारी आहेत, त्यांच्या संपूर्ण व्यवहार पारदर्शी आहे जी एस टी कार्यालयाने 75 बॉक्स फाइल्स जप्त केलेल्या आहेत, लड्डा बंधुची 5 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे, जेल मध्ये ठेवण्यासारखी कोणतीही परिस्तिथी नाही, ते कुठेही पळून जाणार नाहीत, तसेच तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहेत, असा युक्तिवाद सदर सुनावणी वेळी मे. कोर्टासमोर करण्यात आला व सदरवेळी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांचे न्यायनिवाडे सादर केले.
सदरचा युक्तिवाद व न्यायनीवडे विचारात घेऊन मे. कोर्टाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते 2 पर्यंत जी.एस.टी. कार्यालय सोलापूर येथे हजेरी लावणे, तसेच पासपोर्ट जी.एस.टी कार्यालयाकडे जमा करणे अशा अटींवर आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.
सदरकमी व्यापारी लड्डा बंधू यांच्यातर्फे एडवोकेट श्री शशी कुलकर्णी, एडवोकेट गुरुदत्त बोरगावकर, एडवोकेट देवदत्त बोरगावकर, एडवोकेट विश्वास शिंदे तसेच सरकारतर्फे एडवोकेट महेश झंवर यांनी काम पाहिले….