ज्ञानदीप को.ऑप.क्रेडिट सोसायटी म्हणजे सहकारातील मानबिंदू – डाॅ बागल (शहर उपनिबंधक )…
ज्ञानदिप सोसायटी को. ऑप. क्रेडिट सोसायटीला महाराष्ट्र शासनाकडून "सहकार भूषण" व "सहकार महर्षी"पुरस्कार...

४६ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञानदिप सोसायटी को. ऑप. क्रेडिट सोसायटीने यशस्वीपणे पार केला ६००० कोटींचा टप्पा...
आज २ सप्टेंबर ज्ञानदिप सोसायटी को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा वर्धापन दिन.त्या निमित्त या सोसायटीच्या कार्यालयात वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन शहर उपनिबंधक बागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दीप प्रज्वलन नंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला.
सोसायटीचे संचालक / संस्थापक विश्वनाथ पवार ,अध्यक्ष जिजाबा पवार ,उपाध्यक्ष चंद्रकांत धमाळ,सचिव चंद्रकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात ज्ञानदिप सोसायटी को. ऑप. क्रेडिट सोसायटी यशस्वी पणे वाटचाल करत आहे.
महाराष्ट्रात सहकार चळवळीत आर्थिक पायावर स्वावलंबी असलेली एक आदर्श अग्रगण्य व प्रथम क्रमांक असलेल्या ज्ञानदीप ने सभासद /ठेवीदार / कर्जदार यांच्या महत्वपूर्ण सहकार्यामुळे ४६ व्या वर्षात पदार्पण करत असताना ६००० कोटींचा यशस्वी टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासना कडून “सहकार भूषण” व “सहकार महर्षी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच संस्थेस सहकार भारती नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये देशात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.या पुढे अश्याच पद्धतीने आपल्या कार्याची वाटचाल सुरू राहणार असल्याचे या सोसायटीचे सोलापूर प्रतिनिधी नितीन ढवन यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले .
प्रमुख अतिथी मान्यवर उपनिबंधक बागल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार ,माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी दीप ज्ञानाचा प्रकाश धनाचा या वाक्य प्रचिती प्रमाणे ही सोसायटी यशाची गरुड झेप घेत आहे. या उत्तुंग भरारी मुळे त्यांची महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरावर दाखल घेऊन “सहकार भूषण” व “सहकार महर्षी” या नावाने पुरस्कार देऊन विशेष सन्मान केला आहे हीच या ज्ञानदीपच्या जिद्द ,चिकाटी ,अथक परिश्रमाची
यशस्वीतेची “गुरुकिल्ली”आहे असे म्हणायला हरकत नाही असे प्रतिपादन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटीचे वरिष्ठ व्यवस्थापक { आय. टी.विभाग } शशिकांत भिलारे ,उपमुख्य व्यवस्थापक { लीगल विभाग } ॲड.रामचंद्र पिसे , मुख्यव्यस्थापक लक्ष्मन चव्हाण , कर्मचारी प्रतिनिधी संजय शिर्के ,
एकनाथ जगताप ,रवींद्र केंजळे, विजय कासुर्डे,बाळासाहेब वांजळे , अनुप पवार ,शुभम पवार, किरण तपकिरे , हनमंत धिवार, निवृत्ती मस्के , छाय शिंदे , दुर्गा वाघ ,यांच्यासह कर्मचारी दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी अथक परिश्रम घेतले…
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणेश बारसकर यांनी केले.