सोलापुरात युवा सेनेचे भर पावसात जोडमार आंदोलन !…

सोलापूर- ( प्रतिनिधी )
– मालवण येथील राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणाला राज्यातील महायुतीचे भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारच जबाबदार असून या शिवद्रोही महायुती सरकारचा कडेलोट केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोलापूर शहर
जिल्हा युवा सेनेच्यावतीने देण्यात आला .
राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्यावतीने रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात जोडे मारो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सोलापुरात शहर – जिल्हा युवासेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली
तसेच शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी चार हुतात्मा पुतळा येथे भर पावसात महायुती सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज कि जय,जय भवानी ,जय शिवाजी,या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय,भ्रष्ट्र आणि मस्तवाल सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी युवा सेनेचे विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड,युवा सेने कॉलेज कक्ष प्रमुख तुषार आवताडे,अनिरुद्ध दहीवडे,सचिन हेगडे,विजय मोटे,दत्त खलाटे,अविनाश भोळे ,विशाल चोरगे , अक्ष बिराजदार,प्रणित जाधव,राहुल कांबळे,प्रथमेश तपासे,सुभाष सातपुते,वैभव लोंढे,नितीन भोसले,गुरुनाथ शिंदे,विष्णू जगताप.,गुरु बेंद्रे यांच्यासह युवासेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===================
महायुती सरकारचा अंत करणार
=====================राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून ते आजच्या महायुती सरकारकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच महापुरुषांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर शिवद्रोही सरकारकडून तर आता महाराष्ट्राचा अंत करण्याचा घाट घातला जात आहे.आगामी काळात शिवद्रोही महायुती सरकारचा अंत केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही.शिवभक्त महायुतीच्या नेत्यांना लोणच्यासाठीसुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत. इतकेच नव्हे तर महायुतीच्या नेत्यांना सोलापुरात सभा आणि जआंदोलन करू देणार नाही.
= बालाजी चौगुले =
जिल्हाप्रमुख, युवा सेना, सोलापूर
=====================
महायुती सरकारचा भ्रष्ट
कारभार कराणीभूत !
===================
छत्रपती शिवरायांचा पुतळा पडण्यामागे महायुती सरकारचा भ्रस्ट कारभार कारणीभूत आहे. केवळ आठ महिन्यात आणि घाईघाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटनाचा इव्हेंट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान करण्यात आला. महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराने छत्रपती शिवरायांनासुद्धा सोडले नाही.त्यामुळे शिवद्रोही सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. सरकारने लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा न उभारल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही.
= विठ्ठल वानकर =
शहर प्रमुख, युवा सेना, सोलापूर
=====================