maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर महानगरपालिकेची रणरागिणी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी रात्रीच्या अंधारात महानगरपालिकेला कामाला लावले : रामवाडी पोलीस चौकीची धोकादायक भिंत ‎मंगळवारी रात्री केली उध्वस्त !

गजानन महाराजांचा पालखी मार्ग झाला सूटसुटीत   !



‎सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

 

सोलापूर महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याचा प्रत्यय नुकताच आला
‎   भैय्या चौकातील रेल्वे पूल पडल्यामुळे यंदा शेगावी राणा गजानन महाराजांचा पालखी सोहळा सात रस्ता मार्गे, मोदी येथील रेल्वे बोगदा, रामवाडी पोलीस चौकी, लक्ष्मी विष्णू चाळ, मरिआई चौक मार्गे दमानी नगर येथे येणार आहे. मात्र या पालखी मार्गावरील रामवाडी पोलीस चौकीची धोकादायक भिंत आणि मरीआई चौकातील पाण्याच्या वॉलचा  मोठा खड्डा पालखी सोहळ्याला मोठा अडसर ठरत होता. आसबे न्यूज ब्युरोच्या माध्यमातून पालखी मार्गावरील दुरावस्थेचे फोटो व बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे तसेच सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी अधिकाऱ्यांच्या टीमसह तातडीने दुसऱ्याच दिवशी या धोकादायक भिंतीची पाहणी केली.  संबंधित पोलीस विभागाला नोटीस काढण्यात आली. नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी लीड घेऊन नोटीस काढल्यानंतर यंत्रणा कामाला लागली.

 



‎ प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी गजानन महाराजांच्या पालखी मार्गाचा संपूर्ण कायापालट करण्याचा विडा उचलला आणि धोकादायक भिंतीसह मरीआई चौकापर्यंत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली. गजानन महाराजांची पालखी  सोलापुरात दोन दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. कार्यवाहीला उशीर होत असल्यामुळे श्रीदेवी फुलारे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्यासुद्धा ही बाब निदर्शनास आणून दिली होती. महापौर कोंड्याल यांनी मंगळवारी दिवसभरात गजानन महाराज पालखी मार्गाबाबत पाहणी करून तातडीने उपायोजना  करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
‎   महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी तातडीने यंत्रणा राबवली.नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी धोकादायक भिंत जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर मंगळवारी रात्री विभागीय अधिकारी विजय लोखंडे आणि कनिष्ठ अभियंता शिवाजी नलावडे यांनी जेसीबीच्या सहाय्याने रामवाडी पोलीस चौकीची धोकादायक भिंत उध्वस्त केली.

 

 

त्यामुळे गजानन महाराजांच्या पालखीचा मार्ग आता विना जोखीम झाला आहे. तसेच या मार्गावरून येणाऱ्या दररोजच्या हजारो वाहनधारकांचा सुद्धा जीव भांड्यात पडला आहे. श्रीदेवी फुलारे यांनी या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. महापौरांसह आयुक्तांनी सुद्धा नगरसेविका फुलारे यांचे म्हणणे मनावर घेतले आणि अखेर रामवाडी पोलीस चौकीची धोकादायक भिंत मंगळवारी रात्री पाडून टाकण्यात आली.नगरसेवकांनी मनावर घेतल्यानंतर काय रिजर्ट समोर येतो, हे नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या कामावरून दिसून आलं श्रीदेवी फुलारे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव विराज फुलारे हे देखील  अहोरात्र सेवेत होते.

‎    मोदी रेल्वे बोगदा ते मरीआई चौकापर्यंतचा गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग आता सुसज्ज झाल्यामुळे महापौर विनायक कोंड्याल,नगरसेविका श्रीदेवी फुलारे, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे नगर अभियंता सारिका अकुलवार, विजय लोखंडे, शिवाजी नलावडे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे सोलापूरकरांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button