crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

खुनातील आरोपीने इच्छामृत्यू मिळणे बाबत केला न्यायालयात अर्ज

सासऱ्याच्या खुनाच्या आरोपावरून सोळा महिने कारागृहात

बंदीवासात असलेला आरोपी मंगेश देविदास सलगर रा. कोळेगांव, ता. मोहोळ याने इच्छा मृत्यु व अवयव दान होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला !
राम हिंगणी, ता. मोहोळ येथे दिनांक २८/०४/२०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीच्या वादातून सासरे बापूराव तुळशीराम माशाळ यांचा चाकूने मारून खून केला, सासू आशा बापूराव माशाळ, मेव्हणा अभिषेक बापूराव माशाळ यांना गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून मंगेश देविदास सलगर रा. कोळेगाव ता. मोहोळ याला मोहोळ पोलिसांनी दि. २८/०४/२०२५ रोजी अटक करुन न्यायालयात दोषारोप पत्रक पाठवले. सदर खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात सुरु आहे.

 

 

 

आरोपी मंगेश सलगर व त्याची पत्नी यांनी मोहोळ न्यायालय, सोलापूर न्यायालय, कौटूंबिक न्यायालयात एकमेकांविरुध्द दिवाणी व फौजदारी खटले दाखल केले आहेत. पती पत्नीच्या वादामुळे आरोपीची पत्नी माहेरी आईवडिलांबरोबर राहत होती. घटनेदिवशी आरोपीचा सासरा बापुराव माशाळ, सासु आशा ही घरातील पोर्चमध्ये तर त्याची बायको निशा ही घरामध्ये तर मेव्हणा अभिषेक घरालगत असलेल्या खोलीत झोपलेले असताना आरोपी तिथे गेला आणि चाकुने सासऱ्यावर हल्ला करुन त्याचा खुन केला, सोडवासोडवी करणाऱ्या सासु व मेव्हण्यावर चाकुने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. या आरोपावरुन मोहोळ पोलिसांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

 

 

 

 

सदरचा खटला दि. १९/०८/२०२६ रोजी सोलापुर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी नेमण्यात आला होता. त्या दिवशी आरोपीने न्यायाधिशांकडे लेखी अर्ज दिला. “गेली सोळा महिने मी कारागृहात सजा भोगत आहे. परंतु आता कारागृहात सजा भोगण्याची अथवा दिवस काढण्याची माझी शारिरीक व मानसिक स्थिती राहिली नाही. मी पुर्णपणे खचलो आहे. उलट काहीतरी चांगले काम माझ्याकडून होण्याची माझी आशा आहे. मला इच्छा मृत्यु घ्यावा व माझे सर्व अवयव दान करण्यात यावे जेणे करुन अनेकांना जिवदान मिळेल, नवसंजीवनी मिळेल, जोपर्यंत माझी न्याय मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मला आमरण उपोषणाची परवानगी मिळावी व माझ्या उपोषणादरम्यान अन्य कैद्याकडून मानसिक त्रास, शिवीगाळ अथवा मारहाण होऊ नये यासाठी सुरक्षा द्यावी ही विनंती ” या मजकुराचा अर्ज न्यायालयाकडे केला.

 

 

सदर अर्जावर न्यायाधिशांनी सरकारी वकील व कारागृह अधिकाऱ्यांचे म्हणणे मागवले. सदर अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकले. सदरच्या अर्जातील आरोपीची विनंती व सदरचा खुन खटला या वेगवेगळया गोष्टी आहेत असे मत व्यक्त करुन आरोपीचा अर्ज दप्तरी दाखल (खारीज) करुन जेल अधिक्षक यांना आरोपीचे समुपदेशन करावे व गरज पडल्यास आरोपीला वैद्यकीय मदत द्यावी असे आदेश दिले.

 

 

 

सदर अर्जाच्या सुनावणी प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने तर सरकारपक्षातर्फे ॲड. पी. ए. जन्नु यांनी काम पाहिले.
खुनाच्या आरोपावरुन जेलमध्ये असलेल्या आरोपीने देह दानाची व अवयव दानाची परवागनी मिळणेचा न्यायालयाकडे अर्ज करण्याची ही न्यायालयीन इतिहासातील पहिलीच घटना !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button