Epaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

विकासकामांबरोबरच मतदानाचाही हक्क बजावण्याची आवश्यकता

आमदार देवेंद्र कोठे : एसआयआर यादीत नाव नसल्यास अद्यापही नाव नोंदणीची मुदत असल्याने नोंदणी करण्याचे आवाहन

 

सोलापूर : प्रतिनिधी

नागरिकांनी विकासकामांबरोबरच मतदानाचाही पवित्र हक्क बजावण्याकरिता जागरूक असले पाहिजे. त्यामुळे ज्या नागरिकांचे नाव एसआयआर यादीत आलेले नाही त्यांना नाव नोंदणीसाठी अद्यापही मुदत असून अशा नागरिकांनी यंत्रणेतील संबंधितांशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. अंत्रोळीकर नगर परिसरातील राजेश कुमार नगर येथे असलेल्या श्री गणेश मंदिर आणि श्री हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमिपूजन शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते झाले.

 

 

 

 

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेवक अक्षय अंजीखाने, माजी नगरसेवक आणि एसआयआरचे शहर मध्यचे बीएलए गुरुशांत धुत्तरगावकर, भारतीय जनता पार्टी एससी मोर्चाचे राजाभाऊ माने, रविकांत कोळेकर, भाजपचे मंडल अध्यक्ष नागेश सरगम, महेश बनसोडे, धनराज आनंदाणी उपस्थित होते.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते श्री गणरायाची आणि श्री हनुमंताची आरती करण्यात आली तसेच आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक आणि परिसरातील नागरिकांच्या हस्ते कुदळ मारून सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून करण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन झाले. या सभा मंडपासाठी ३६ लाख ५८ हजार रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे.

 

 

 

 

सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या राजेश कुमार नगर येथे भव्य सभा मंडप बांधण्याबरोबरच बाग, मैदान, पार्किंग आदी सोयी देण्यात येणार आहेत. तसेच येथील घरांच्या खरेदी खताच्या रखडलेल्या कामाबाबत पुढील दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत तोडगा काढण्यात येईल.

यावेळी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेविका संगीता जाधव, अक्षय अंजिखाने, रविकांत कोळेकर, मंडल अध्यक्ष नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन तर नगरसेवक सात्विक बडवे यांनी प्रास्ताविक केले.

 

 

 

 

या कार्यक्रमास निशिकांत खेडकर, सुवर्णा दास, शक्ती केंद्रप्रमुख राघवेंद्र सावळगी, बूथ प्रमुख संतोष हलकुडे, राहुल म्हेत्रे, नितीन भिसे आदी उपस्थित होते.

सभा मंडप भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी राजाभाऊ माने, सुवर्णा तोटुंगल(दास), धनराज आनंदानी, मिलिंद माईणकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button