socialindia- worldmaharashtrapoliticalsolapur

विकास आणि हिंदुत्वाचा सुवर्णसंगम साधत करणार ‘शहर मध्य’ चा कायापालट

आमदार देवेंद्र कोठे : श्री पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात सभामंडपाचे भूमिपूजन

 

सोलापूर : प्रतिनिधी

देव देश धर्माच्या कामासाठी हिंदुत्व संरक्षणासाठी सोलापूरकरांनी भरभरून मतदान करून मला विधानसभेत पाठवले आहे. आता माझी जबाबदारी म्हणून विकास आणि हिंदुत्वाचा सुवर्णसंगम साधत शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.

 

 

 

 

वालचंद महाविद्यालयाजवळील भावनाऋषी पेठेतील श्री पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर विनायक कोंड्याल, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेविका सुनीता कामाठी, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेविका अंबिका चौगुले, स्थायी समितीचे माजी सभापती राजमहेंद्र कमटम, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेवक प्रशांत पल्ली, राजश्री दोडमणी, सिद्धेश्वर कमटम, अक्षय अंजीखाने, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, अशोक दुस्सा, नागेश सरगम, भीमाशंकर बोळकोटे, पेंटप्पा गड्डम, विश्वनाथ मेरकर, मल्लिकार्जुन सरगम उपस्थित होते.

 

 

 

 

प्रारंभी भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि राम तडवळकर या दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. तसेच आमदार देवेंद्र कोठे आणि प्रभागातील मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, श्री पंचमुखी हनुमान देवस्थान परिसरात शाखा लागते. राष्ट्राला दिशा देणाऱ्या देव देश धर्माचे काम या परिसरात होते. हा परिसर राष्ट्रीय विचारांशी बांधील असलेला परिसर आहे. येथील नागरिकांच्या सोयीसाठी देवस्थानाला ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.

 

 

 

 

याप्रसंगी श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् विश्वस्त मंडळाचे यादगिरी बोम्मा, सुधाकर सिंगम, अंबादास बोल्ली, भूपती कमटम, श्रीनिवास गुर्रम, अजय बुरा, सदानंद गुंडेटी, भगवान कामुनी, श्रीनिवास गाली, अंबादास चिंताकिंदी, श्रीहरी बोम्मा, जयप्रकाश इप्पलपल्ली, श्रीनिवास कमटम, शंकर चौगुले, डॉ. प्रकाश ताटी, अंबादास रच्चा, व्यंकटेश गुर्रम, विजया वड्डेपल्ली, दिपाली श्रीगारी यांच्यासह नागरिक, मंदिर विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————
चौकट

हिंदूंना मंदिर जीर्णोद्धारासाठी २० वर्षे वाट पहावी लागली

पूर्वी हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे देवस्थानांकडे दुर्लक्ष होत होते. श्री पंचमुखी हनुमान देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठीही हिंदूंना २० वर्षे वाट पहावी लागली. मात्र आता सर्वत्र हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार असल्यामुळे मंदिरे, देवस्थानांच्या परिसरात विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे भरघोस निधी उपलब्ध होत आहे, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
———

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button