educationalEpaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapurSports

पाढ्यांतून गणिताची गोडी, वाचनातून मराठीची श्रीमंती!

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

 

सोलापूर :

 

 

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी आणि मराठी भाषेवरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून दोन अभिनव शैक्षणिक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुरेशबाबू मंकणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्तव्यदक्ष, विद्यार्थीप्रिय व प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले मुख्याध्यापक मा. श्री. प्रकाश कांबळे सर यांच्या प्रेरणेने ‘दिनांकानुसार पाढे म्हणणे’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा पाढ्यांचा नियमित सराव होऊन गणित विषयाबद्दलची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.

 

 

 

तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातील एका मराठी तासिकेत प्रत्येक वर्गासाठी ‘मराठी अवांतर वाचन तासिका’ सुरू करण्यात आली आहे. कथा, कविता, चरित्रे, ललित लेख आदी साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांची भाषिक समृद्धी, कल्पनाशक्ती व विचारक्षमता विकसित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

 

 

 

गणितातून तर्कशक्ती आणि वाचनातून विचारशक्ती विकसित करणारे हे दोन्ही उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button