क्राइम पत्रकार संघाच्या खजिनदारपदी रवि मस्के यांची निवड; सुधीर खरटमल यांच्या हस्ते सत्कार

सोलापूर
सोलापूर क्राइम पत्रकार संघाच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी खजिनदारपदी वरिष्ठ पत्रकार रवि मस्के यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) सोलापूरचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक *सुधीर खरटमल यांच्या शुभहस्ते रवि मस्के यांना हार व शाल घालून सत्कार करण्यात आला.
यावेळेस बोलताना खरटमल म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड, अभ्यासू आणि अनुभवी पत्रकार म्हणून रवि मस्के यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक प्रश्न, गुन्हेगारी विषय तसेच जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्याचा क्राइम पत्रकार संघाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वाससुद्धा व्यक्त केला.
रवि मस्के यांची खजिनदारपदी झालेली निवड ही त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल असून, या माध्यमातून संघाच्या विविध उपक्रमांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी सूर्यकांत शेरखाने, द्वारकादास तावनीया, प्रविण वाडे, ज्ञानेश्वर सोनवणे, महादेव इंगळे, जाविद शिकलकर, रामप्रसाद शागालोलू, शक्ती कटकधोंड आणि मित्रपरिवार उपस्थित होता. उपस्थितांनी रवि मस्के यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



