Epaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीनिमित्त‎ ह.भ.प.शिवलाल‎ महाराज‎ यांच्या‎ दिव्य सानिध्यात श्रीकृष्ण अध्यात्मिक‎ मठात भक्तिमय गुलाल‎ सोहळा

 

HTML img Tag Simply Easy Learning

.

 

सोलापूर (प्रतिनिधी)‎

 

महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक २२‎ मधील श्रीकृष्ण अध्यात्मिक मठ‎ सेटलमेंट‎ फ्री कॉलनी‎ चव्हाण‎ वस्ती परिसरातील श्रीकृष्ण मठात‎ जन्माष्टमीनिमित्त विविध‎ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.‎ शनिवारी दुपारी‎ जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात‎ आलेला भक्तिमय‎ गुलाल‎ सोहळा‎ मोठ्या उत्साहात,‎ भक्तिभावपूर्ण‎ व‎ मंगलमय‎ वातावरणात‎ संपन्न‎ झाला गुलाल‎ सोहळ्याच्या‎ प्रारंभी‎ संपूर्ण सेटलमेंट परिसरातून नगर‎ प्रदक्षिणा काढण्यात‎ आली. यावेळी‎ भाविकांनी मोठ्या‎ संख्येने‎ सहभागी होत ‘गोविंदा’च्या जयघोषात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.‎ नगर‎ प्रदक्षिणेदरम्यान‎ परिसरात भक्तिमय‎ वातावरण‎ निर्माण‎ झाले होते.‎ या सोहळ्यास १०३ वर्षीय ह.भ.प.‎ शिवलाल स्वामी महाराज‎ यांची‎ विशेष‎ उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित भक्तांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे‎ आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व सांगितले. भगवान‎ श्रीकृष्णांनी दिलेला प्रेम,‎ भक्ती,‎ कर्म,‎ सत्य आणि धर्माचा‎ संदेश‎ प्रत्येकाने‎ आपल्या जीवनात‎ आचरणात आणावा, असे‎ आवाहन त्यांनी‎ केले. भक्तीमध्ये‎ श्रद्धा‎ आणि‎ आचरणामध्ये‎ सदाचार असेल, तर‎ जीवनाला‎ सकारात्मक‎ दिशा‎ मिळते, असा संदेशही‎ त्यांनी‎ दिला.‎ यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार‎ यांनी श्रीकृष्ण‎ भगवान यांचे‎ दर्शन‎ घेऊन आशीर्वाद‎ घेतला.‎ तसेच ह.भ.प.शिवलाल स्वामी‎ महाराजांचे आशीर्वाद‎ घेतल्यानंतर‎ त्यांनी उपस्थित‎ भक्तगणांना‎ श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीच्या‎ शुभेच्छा‎ दिल्या‎ जन्माष्टमीच्या‎ पवित्र उत्सवानिमित्त‎ भाविकांसाठी महाप्रसादाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎

 

 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते‎ महाप्रसादाचे पूजन‎ करण्यात‎ आले.‎ याप्रसंगी‎ उपमहापौर ज्ञानेश्वरी‎ देवकर,‎ पोलीस‎ आयुक्त एम.‎ राजकुमार, डॉ. सूर्यप्रकाश‎ कोठे,‎ भाजपचे‎ ज्येष्ठ‎ नेते दिलीप‎ कोल्हे, प्रभाग क्रमांक २२ चे‎ भाजपा‎ नगरसेवक किसन‎ जाधव,‎ नागेश‎ मामा‎ बाबुराव गायकवाड, सलगर‎ वस्ती पोलीस‎ स्टेशनच्या‎ वरिष्ठ पोलीस‎ निरीक्षक‎ श्रीशैल‎ गजा,लहू‎ गायकवाड, सुधीर बहिरवाडे,‎ श्रीकांत श्रीराम जाधव, सचिन‎ विलास‎ जाधव यांच्यासह वारकरी‎ संप्रदायातील‎ भक्तगण‎ विविध‎ क्षेत्रांतील‎ मान्यवर आणि‎ मोठ्या संख्येने भाविक‎ उपस्थित‎ होते.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button