crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; ५.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; ५.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

सोलापूर

सोलापूर शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत घरफोडी आणि मोबाईल चोरीचे तब्बल चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल असा एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

 

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरातून सोन्याचे दागिने तसेच गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(ए) अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्यांचा समांतर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार आणि व.पो.नि. गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.

 

 

 

 

तपासादरम्यान दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

दरम्यान, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गणेश किसन बोधवाले, रा. लोधी गल्ली, आर. के. हॉस्पिटलजवळ, सोलापूर, याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २६ हजार ६४८ रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

या कारवाईमुळे चार गुन्ह्यांचा छडा लागला असून एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अरूण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार आणि व.पो.नि. गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button