सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणारी अवैध गावंठी देशी दारूची हातभट्टी उध्दवस्त…
सोलापूर तालुका, पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांचे कार्यालयाकडील कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची कामगिरी...

सोलापूर
4000 लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्ट
दिनांक 26.08.2024 रोजी आगामी काळात येणारे गणपती उत्सव व इतर महत्वाचे उत्सव शांततेत पार पाडुन उत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील मुळेगावं ताडा येथे चोरून चालणा-या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टया उध्दवस्त करण्याच्या अनुषंगाने मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री.संकेत देवळेकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल देशपांडे, यांचे नेतृत्वाखाली पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोरून अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टीवर छापा टाकुन कारवाई केली आहे.
अवैधरित्या चालणा-या हातभट्टीवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 1 लाख 48 हजार रूपये किंमतीचा त्यामध्ये 4000 हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, 20 बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूची हातभट्टी उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. सदर बाबत पोलीस नाईक शंकर मुजगोंड यांनी पोलीस ठाणेस दिलेल्या फिर्यादी वरून 1 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 फ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे कार्यालयाकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मौजे दोड्डी ता.दक्षिण सोलापूर येथील यशराज हॉटेलच्या पाठीमागे देशी विदेशी दारूची विक्री करणा-या 2 इसमा विरूध्द छापा कारवाई करून त्यामध्ये 17 हजार 305 रूपये किंमतीच्या 56 देशी विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. सदर बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाकडील पोलीस नाईक विश्वनाथ सिद्राम मंजुळकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून 2 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुढेही चोरून अवैध व्यवसाय करणा-या इसमांची गोपनियरित्या माहिती प्राप्त करून त्यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची छापा कारवाई मा.श्री.अतुल कुलकर्णी,पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक अभंग सहायक पोलीस निरीक्षक कदम, श्रेपोउपनि/ जाधव, कांबळे, सपोफौ/ बागवान, बाणेवाले, पोहवा/सय्यद, मपोहवा/कुंभार, पोना/ शेख, मुजगोंड व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांचे कार्यालयाकडील सपोनि/झालटे, पोना/शेख, मंजुळकर व पोलीस अंमलदार कुंभार यांनी केली आहे.