“सुखदेव” नाव ऐकायलाच चांगले मात्र कुटाना भलताच मंडळ अधिकाऱ्याच्या कारनाम्याची ही बातमी …
मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांच्या कारनाम्याचा K City News कडून पर्दाफाश....

सोलापूर
यात थोडक्यात हकीकत अशी की, सोलापुरातील व्यावसायिक दिलीप राठोड यांच्या टिपर वाहनावर बापूराव महादेव रणदिवे वय:- ४७ वाहनचालक रा. पो.वांगी मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे वाहनचालक म्हणून गेल्या वर्ष भरापासून नोकरीस आहेत.
सकाळी ९ च्या सुमारास बापूराव महादेव रणदिवे हे नेहमी प्रमाणे त्याचे मालक दिलीप राठोड यांच्या घरापासून द्वारका नगर येथून कामासाठी गाडी पुढच्या कामाला मार्गस्थ झाले .दुपारी ३ वा.सुमारास फौजदार शाळा राजस्व नगर येथे त्यांच्या कडे असलेली टिपर वाहन क्रमांक MH 25 u 1119 ही गाडी बंद पडली . याची माहिती बापूराव महादेव रणदिवे यांनी त्यांचे मालक दिलीप राठोड यांना फोन करून कळविली.इतक्यात काही क्षणात उत्तर चे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील हे घटस्थळी आपल्या इतर साथी दारांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. व वाहन चालक बापूराव महादेव रणदिवे यांना त्यांच्याकडे असलेल्या वाहनाची चावी मागितली यानंतर बापूराव महादेव रणदिवे यांनी चावी देण्यास नकार दिल्यानंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी व त्यांच्या ईतर सहकाऱ्यांनी मिळून वाहनचालक बापूराव महादेव रणदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पतुरे यांना गच्ची ला धरून वाहनातून बाहेर काढून जबर मारहाण केली .यानंतर बापूराव महादेव रणदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पतुरे हे दोघेही घटना स्थळावरून भिऊन पळून गेले.
या नंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी स्वतः दिलीप राठोड यांचे टिपर वाहन विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेले. विजापूर नाका पोलिसांनी वाहन ठेवून घेण्यास नकार दिल्याने संबंधित वाहन सुखदेव पाटील यांनी उत्तर तहसील कार्यालयात नेऊन लावले.
वास्तविक सुखदेव पाटील हे उत्तर मंडळ अधिकारी असताना त्यांना बापूराव महादेव रणदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पतुरे यांना मारन्याचा अधिकार दिला कोण? सुखदेव पाटील यांनी नुसतीच मारहाण केली नाही तर बापूराव महादेव रणदिवे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप वाहनचालक बापूराव महादेव रणदिवे यांनी केला आहे . एखाद्या व्यक्तीने कुठल्याही शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्या कामात अडथळा केला तर संबंधितावर भादवी कलम ३५३ चा गुन्हा दाखल होतो.यावेळी मंडळ अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून या घटनेत वाहनचालकाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून दिलीप राठोड यांचे वाहन जबरदस्तीने उत्तर तहसील कार्यालयात लावले असल्याने या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांना नेमके कुणाचे वरदहस्त आहेत ?कुणाच्या जोरावर पाटील मनमानी कारभार करतायत याची सखोल चौकशी मागणी व्यवसायिक दिलीप राठोड यांनी केली आहे.
सध्या बापूराव महादेव रणदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पतुरे यांच्यावर केअर हॉस्पिटल सैफुल तेथे उपचार केले जातायत . दोघांची प्रकृती स्थिर असून याबाबत मंडळ अधिकारी सुखदेव पाटील व त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर तात्काळ ॲट्रॉसिटी चा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जखमी बापूराव महादेव रणदिवे यांनी केली आहे. या घटनेची नोंद आता विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत…
सोलापुर नगरीत प्रथमच महा कल्याणकारी अतिरुद्र स्वाहाकार