educationalindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा … राष्ट्रवादीच्या वतीने सन्मान..

सोलापूरचे सुपुत्र आदित्य चंद्रकांत प्रधान यांची १० व्या आशियाई युवा पुरुष हॅंडबाॅल स्पर्धेसाठीसाठी भारतीय युवा खेळाडू म्हणून निवड ...

सोलापूर

३ सप्टेंबर,ते १४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अमन,जाॅर्डन येथे होणाऱ्या १० व्या आशियाई युवा पुरुष
हॅंडबाॅल स्पर्धेसाठीसाठी भारतीय युवा खेळाडू म्हणून दयानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी .आदित्य चंद्रकांत प्रधान या युवा खेळाडूची निवड झाली. त्याबद्दल जुनी मिल येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला .

या निवड प्रक्रियेबद्दल सोलापूरकरांच्या वतीने आदित्यचे विशेष कौतुक केले जात आहे .आदित्यचे प्राथमिक ओळख सांगायची झाली तर
आदित्यचे माध्यमिक शिक्षण दयानंद काशिनाथ असावा प्रशाला येथे झाले. तो पाचवीपासून हँडबॉल खेळाचा सराव सकाळ संध्याकाळ दयानंद च्या मैदानावर करत आहे.त्याने दोन शालेय राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या आणि त्या दोन्ही मध्ये पण दयानंद चा संघ हा पहिल्या क्रमांकावर विजयी झाला आहे.

व आदित्य ची दोन्ही वेळेस राष्ट्रीय संघात निवड झाली. या आंतरराष्ट्रीय खेळाडूस क्रीडाशिक्षक प्रमोद कुनगुलवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.दयानंद शिक्षण संस्था न्यू दिल्ली संचलित अध्यक्ष मा.डाॅ.पुनमजी सुरी ,स्थानिक सचिव मा.महेश चोप्रा ,प्रशासक मा.प्रो.डाॅ.विजयकुमार उबाळे,प्राचार्य एस.बी.क्षिरसागर,प्र.प्राचार्य प्रो.डाॅ.बद्रीनाथ दामजी,मुख्याद्यापक श्री.जितेंद्र पवार व दयानंद परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे खुप खुप अभिनंदन केले आहे.. तसचे ह्या खेळाडूंस परम मित्र .रुपेश मोरे (शिवछत्रपती पुररस्कार विजेते ) हँडबाल असोसिएशन ऑफ इंडिया चे सहसचिव तसेच श्री राजेंद्र राऊत सर (शिवछत्रपती पुररस्कार विजेते ) महाराष्ट्र हँडबॉल महाराष्ट्र महासचिवत्याला क्रीडाशिक्षक डाॅ.किरण चोकाककर व प्रमोद कुणगुलवार सरांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

या सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते हेमंत चौधरी बिज्जू प्रधाने महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव युवती अध्यक्ष किरण माशाळकर विद्यार्थ्यी अध्यक्ष पवन पाटील शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल युवक समन्वयक महेश कुलकर्णी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष अमीर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे उपाध्यक्ष प्रकाश शिंदे प्रवक्ते नागेश निंबाळकर सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे उपाध्यक्ष शत्रुग कांबळे VJNT विभाग अध्यक्ष रुपेश भोसले वाहतूक सेल इरफान शेख कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंदउत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके शहर मध्य कार्याध्यक्ष विकास हिरेमठ अल्पसंख्याक विभाग दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष मोईज मुल्ला डॉक्टरचे विभाग अध्यक्ष डॉ. संदीप माने कार्याध्यक्ष महेश वसगडेकरसोशल मीडिया विभाग शहर – जिल्हाध्यक्ष
वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शाहिद शेख फिरोज शेख प्रियंका जगझाप प्रियंका कांबळे विनाश इब्रामपुरे शामराव गांगर्डे रोहित कांगरे राजूसिंग फटफटवाले नरसिंग जंगम यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button