crimeeducationalentertainmentindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

वैभव गंगणे यांच्या प्रत्येक कार्यात मी सोबत असेन:- जिल्हा सरकारी वकिल ॲड. प्रदीपसिंग राजपूत…

राष्ट्रवादी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित अजित पर्व निबंध लेखन स्पर्धेत उमाबाई श्राविका विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी सुनील जाधव हिने पटकावला प्रथम क्रमांक..

अजित पर्व निबंध लेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद:- रवींद्र नाशिककर

राज्याचे विकासरत्न लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने अजित दादांच्या विकास कार्य पद्धतीवर आधारित अजित पर्व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा निकाल जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत , स्पर्धेचे मुख्य निरीक्षक रवींद्र नाशिककर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ,उमाबाई श्राविका महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे,जैन गुरुकुल विकास शेळे,बसवरत्न संघटनेचे अमित रोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी CBI विभागाचे विशेष सरकारी वकील तथा जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत हे होते.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे काढताच कित्येक आरोपींना थरकाप उडतो.आतापर्यंत त्यांनी विविध गुन्ह्यात १०० जन्मठेप व २ फाशीच्या शिक्षे पर्यंत आरोपींना पोहचवले आहे . गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून त्यांची सोलापूर शहर – जिल्ह्यासह राज्यात विशेष ख्याती आहे.
तर स्पर्धेचे मुख्य निरीक्षक रवींद्र नाशिककर यांनी ५० पेक्षा अधिक पत्रकारांना घडविले आहे .

त्यांनी खो – खो स्पर्धेतून अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन शासकीय पदापर्यंत पोहचवले आहे.ते खो – खो संघटनेचे क्रीडा संघटक आहेत .

{ मनोगत} यावेळी प्रास्ताविकेत आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. वैभव गंगणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे विकासरत्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व अजित दादांनी राज्यात सर्व घटकांसाठी राज्याच्या विकासासाठी केलेल्या विकासावर प्रखर पणे प्रकाश टाकण्यासाठी अजित दादांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मन: पूर्वक आभार प्रकट केले.

{ मनोगत } यानंतर प्रशालेचे प्राचार्य सुकुमार मोहोळे सर यांनी सुरुवातीला कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यानंतर आयोजक वैभव गंगणे यांनी विद्यार्थ्यासाठी घेतलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अन्य वायपट खर्चाला फाटा देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

{ मनोगत } जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी आपल्या मनोगतात जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीपसिंग राजपूत हे आरोपींचा कर्दनकाळ असणारे सुप्रसिद्ध वकील असून त्यांची ख्याती ही सोलापूर शहर – जिल्ह्यासह राज्यभरात अल्पावधीत विशेष परिचित झाली आहे.

त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या आरोपींना गुन्ह्यात १०० जन्मठेप व २ फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवले. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे निघताच गुन्हेगारांना थरकाप उडतो . ते CBI विभागाचे विशेष सरकारी वकिल असल्याचे सांगत त्यांची भूमिका ही नेहमी आपल्या कार्य शैलीतून न्याय मिळवून देण्याची राहिली आहे असे मत व्यक्त केले…

{ मनोगत} स्पर्धेचे मुख्य निरीक्षक रवींद्र नाशिककर यांनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विद्यार्थ्यांना राज्याच्या विकास रत्न लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यावर आपल्या कार्य शैलीतून लेखनास सुवर्ण संधी मिळाली आणि त्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करून दाखविले.स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे काढताना तारेवरची कसरत करावी लागली. अतिशय चांगल्या व सुवर्ण अक्षरात विद्यार्थ्यांनी निबंध लिहिल्याचे सांगत सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत असे उपक्रम प्रत्येक राजकीय पक्ष संघटना यांनी घ्यावेत असे आवाहन करत
वैभव गंगणे यांनी समाजात या निमित्ताने एक वेगळा आदर्श प्रस्थापित केल्याचे मत व्यक्त केले ….

{ मनोगत} जिल्हा सरकारी वकिल ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी त्यांच्या मनोगतात वैभव गंगणे हे एक आदर्शवत पत्रकार असून अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घेतलेला उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य करत आहे असे प्रतिपादन केले. असे व याही पेक्षा चांगले उपक्रम येणाऱ्या काळात देखील वैभव गंगणे यांनी हाती घ्यावेत .त्यांच्या प्रत्येक कार्यात मी सोबत असेन असेही मनोगत व्यक्त केले. अश्या स्पर्धांच्या माध्यमातून उद्याची पिढी ही विविध स्तरांवर नक्कीच आपले नाव उज्वल करेल.तेव्हा याच विद्यार्थ्यांना वैभव गंगणे यांनी घेतलेल्या उपक्रमाची नक्कीच आठवण राहील असे जिल्हा सरकारी वकिल ॲड. प्रदीपसिंग राजपूत म्हणाले…

आभार प्रदर्शनात उमाबाई श्राविका प्रशालेचे शिक्षक गणेश लेंगरे यांनी विविध पक्ष येतात स्पर्धा घेतात नंतर बक्षीस देऊ म्हणतात पण देत नाहीत मात्र वैभव गंगणे व संतोष भाऊ पवार हे अजित दादांच्या विचारावर चालतात म्हणून दिलेल्या शब्दाचे ते वचनपूर्ती करतात हा आदर्श इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवा असे मत व्यक्त करत मान्यवरांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमास हजर राहून कार्यकर्माची शोभा वाढविली याबद्दल आभार प्रकट केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button