maharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना राष्ट्रवादी कडून अभिवादन …

सोलापूर

आज १२ जानेवारी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंतीनिमित्त राष्ट्रवादी भवन कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिजाऊ माँ साहेबांचा विजय असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .
राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना राजमाता जिजाऊ यांनी प्रेरित केले. राजमाता जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. राजमाता जिजाऊंच्या संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले आणि यातूनच त्यांना आपल्या दीनदुबळ्या शोषीत कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.

राजमाता जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. राजमाता जिजाऊंना चार भाऊ होते. दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे राजमाता जिजाऊंच्या भावांची नावे होती. राजमाता जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला. शहाजी राजे निजामशाहीचे सरदार होते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला.

शिवबांना त्यांनी लहानपणीच रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज युद्ध कला शिकले. 23 जानेवारी 1664 साली शहाजी राजे यांचे देखील निधन झाले. मात्र, पतीच्या देखील राजमाता जिजाऊंनी हार मानली नाही. त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली.

या अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ॲड.सलीम नदाफ , महेश निकंबे, अमीर शेख, खलिल शेख , किरण माशाळकर, प्रियवंदा पवार , कांचन पवार , प्राजक्ता बागल, रुपेश भोसले, इरफान शेख, बसवराज कोळी, अल्मेहराज अबादीराजे, सोमनाथ शिंदे, अशपाक कुरेशी , यांच्या सह प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button