
सोलापूर
सोमवारी सकाळच्या सत्रात भारतीय जनता पार्टीचे चन्नविर चिट्टे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची भेट घेतली. चाय पे चर्चा निमित्त झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या ठिकाणी आपल्याला शहर उत्तर मतदार संघातून संधी देण्यात यावी. या संधीचे सोने करू.
अशी मागणी चिट्टे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.या मागणी नंतर पक्ष श्रेष्ठींकडून चन्नवीर चिट्टे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतो का? माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना डावलून चिट्टे यांना संधी मिळेल का ?.. असे एक ना अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जातायत.
शहरात विविध ठिकाणी चिट्टे यांच्या नावाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय.
यानंतर आता चन्नवीर चिट्टे हे महायुतीतील मित्रपक्ष असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची भेट घेतली. व विविध विषयांवर प्रातिनिधिक स्वरूपात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे…