solapur
निधन वार्ता:- माजी निवृत्त प्रशासकीय अधिकारी कै.अशोक कलशेट्टी यांचे निधन…

सोलापूर
आरोग्य विभागातील माजी निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि भवानी पेठेतील नवदुर्गा मंडळाचे खजिनदार कै.अशोक कलशेट्टी वय ६६ यांचे शनिवार २६ एप्रिल २०२५रोजी रात्री साडेआठ वाजता ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अंत्यविधी भवानी पेठ येथील राहत्या घरापासून रविवारी सकाळी ११ वाजता लिंगायत रुद्रभूमी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, जावई,भाऊ, वहिनी पुतणे पुतणी असा मोठा परिवार आहे.ते पत्रकार सुभाष कलशेट्टी यांचे काका होत.त्यांच्या या निधनाबद्दल सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे .
या दुःखातून कलशेट्टी कुटुंबियांना सावरण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना आता सर्व स्तरातून केली जात आहे…