maharashtrapoliticalsocialsolapur

राजकीय फटाक्यांचा धूमधडाका ⏩ नाना काळे ,दिलीप कोल्हे , सुरेश पाटील , बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपात प्रवेश…

 

 

संपादक:वैभव गंगणे

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर्गत कुरघोडीमुळे नाराज झालेले अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी { शरद पवार गटाचे } ज्येष्ठ नेते आणि माजी स्थायी समिती सभापती नानासाहेब काळे, शिवसेना { शिंदे गटाचे } जेष्ठ नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे  , माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर,

 

 

 

माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील , युवा नेते बिपीन पाटील ,बिज्जू प्रधाने ,मंदाकिनी तोडकरी ,मारुती तोडकरी, माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले, बिपीन पाटील, मदन क्षीरसागर, रवी काळे, मेघराज कल्याणकर, बाळासाहेब तांबे, सुरेश तोडकरी यांनी गुरुवारी रात्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे व आमदार सचिन कल्याणशेट्टी , शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलच उधाण आले आहे. या प्रवेशामुळे सोलापुरात आमदार देवेंद्र कोठे यांचे वर्चस्व वाढले आहे. नाना काळे यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तर दिलीप कोल्हे यांच्यामुळे शिवसेना { शिंदे गटाला } आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका बसला आहे.

 

दरम्यान हा पक्ष प्रवेश सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. यांच्या पक्ष प्रवेशानंतर विविध पक्षातील अनेक बडे मासे भाजपाच्या गळ्याला लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पक्ष प्रवेशामुळे काळे ,कोल्हे ,प्रधाने गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर सोलापुरात कार्यकर्त्यांकडून ऐन दिवाळीत पक्षप्रवेश झाल्याने राजकीय फटाक्यांचा धूमधडाका करण्यात येतोय.या पक्ष प्रवेशा बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार देवेंद्र कोठे,आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नाना काळे ,दिलीप कोल्हे , बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa